मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /12 वर्षांचा मुलगा गेल्या 10 वर्षापासून खातोय फक्त ब्रेड आणि फ्रूट योगर्ट, डॉक्टरांकडे गेल्यावर समोर आलं धक्कादायक कारण

12 वर्षांचा मुलगा गेल्या 10 वर्षापासून खातोय फक्त ब्रेड आणि फ्रूट योगर्ट, डॉक्टरांकडे गेल्यावर समोर आलं धक्कादायक कारण

Food Phobia: जर तुमचं मूल खूपच हट्ट करत असेल आणि इतर पदार्थ पाहिल्यावर रडत वगैरे असेल तर थोडं सावध व्हा.

Food Phobia: जर तुमचं मूल खूपच हट्ट करत असेल आणि इतर पदार्थ पाहिल्यावर रडत वगैरे असेल तर थोडं सावध व्हा.

Food Phobia: जर तुमचं मूल खूपच हट्ट करत असेल आणि इतर पदार्थ पाहिल्यावर रडत वगैरे असेल तर थोडं सावध व्हा.

लंडन, 24 ऑगस्ट:  साधारणपणे वाढत्या वयात मुलांनी पौष्टिक खावं असं सगळ्याच आईवडिलांना वाटतं आणि मुलं खात नसतील तर आईवडिलांना वाटतं की ती खाण्याचे नखरे करत आहेत. पालेभाज्या, फळं वेगेवेगळ्या चवींचे पदार्थ मुलांनी खावेत असं सगळ्याच आईवडिलांना वाटतं. पण जर तुमचं मूल खूपच हट्ट करत असेल आणि इतर पदार्थ पाहिल्यावर रडत वगैरे असेल तर थोडं सावध व्हा. कारण युनायटेड किंग्डममधल्या (United Kingdom) एका मुलाची अशीच तक्रार होती पण त्यात त्याची चूक नव्हती त्याला एक आजार आहे असं डॉक्टरांकडे गेल्यावर लक्षात आलं.

यूकेतील नॉरफोक भागात राहणाऱ्या ॲश्टन फिशर (Ashton Fisher) या 12 वर्षांच्या मुलाबाबत त्याच्या आईवडिलांची (Parents of Teenager) तक्रार हीच आहे की तो फक्त ब्रेड आणि फ्रुट योगर्ट हे दोनच पदार्थ खातो. सणावाराला काही चांगले पदार्थ त्याला खायला दिले तर रडायला आणि आरडाओरडा करायला सुरुवात करतो. कितीही प्रयत्न केले तरीही ब्रेड आणि योगर्टशिवाय तिसरा पदार्थ खाण्याचं नावच घेत नाही. वाढत्या वयातला मुलगा आणि नीट जेवत नाही म्हणजे आईवडिलांना चिंता वाटणारच. आईला पहिल्यांदा वाटलं ॲश्टन नखरे करतोय. पण नंतर तिच्याही लक्षात आलं की तसं नाहीए. त्याला एक अजब आजार आहे ज्यामुळे त्याला अन्नपदार्थ पाहिले तरीही त्रास होतो.

लॉटरीच! फक्त 86 रुपयात इटलीत मिळणार स्वत:चं घर; पाहा कसं खरेदी करायचं

न्यूज वेबसाईट मेट्रोच्या वृत्तानुसार त्याच्या आईवडिलांनी पहिल्यांदा ॲश्टनला डाएटिशियनकडे नेलं. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. ॲश्टनची सवय तशीच राहिली आणि त्याच्या मनातलं भयही तसंच होतं. जेव्हा त्याचे आईवडिल त्याला इटिंग डिसऑर्डर स्पेशलिस्टकडे (Eating Disorder Specialist) घेऊन गेले तेव्हा खरा त्याच्या आजाराचा खुलासा झाला. त्यांनी सांगितंल की ॲश्टनला Avoidant Restrictive Food Intake Disorder (ARFID) हा अन्न खाण्यासंबंधीचा आजार आहे. त्यामुळे ॲश्टनला अन्न पदार्थ खायची भीती वाटते. पण यावर उपायही या स्पेशलिस्टने सांगितला. तो म्हणजे त्याचं काउन्सिलिंग. काउन्सिलिंगसोबत इतरही काही उपाय ॲश्टनवर केले जात आहेत. त्यामुळे तो हॅम सँडविच (Ham Sandwich), रोस्ट डिनर (Roast Dinner), प्रिंगल्स (Pringles) आणि चिकन नगेट्स (Chicken nagets) यासारखे पदार्थ खायची तयारी दाखवायला लागला आहे.

खरेदी करताना ताजे मासे कसे ओळखायचे? वाचा खास टिप्स

 ॲश्टनच्या मनातली ही अन्नपदार्थ खाण्याची भीती हळूहळू कमी होईल आणि तो सगळे पौष्टिक पदार्थ खायला लागेल अशी आशा करूया. पण तुमच्याकडेही घरात कुणाला अशी भीती वाटत असेल तर तुम्हीही इटिंग डिसऑर्डर स्पेशलिस्टचा सल्ला घ्या.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle