Home /News /lifestyle /

फेकून नका देऊ कांदा, लसणाच्या साली; तयार करा टेस्टी सूप आणि भात

फेकून नका देऊ कांदा, लसणाच्या साली; तयार करा टेस्टी सूप आणि भात

कांदा आणि लसणाच्या सालींचा वापर (Use of Onion & Galic Peel) माहिती झाला तर, साठवून ठेवायला सुरुवात कराल.

    दिल्ली, 16 ऑगस्ट : कांदा आणि लसणाचा वापर (Use of Onion & Galic Peel) दररोजच्या स्वयंपाकामध्ये (Cooking) बऱ्याच घरांमध्ये केला जातो. कांद आणि लसूण खाण्याचे बेरचे फायदे (Benefits) आहेत. या फायद्यांबद्दल आपल्याला माहिती असतेच. पण, कांदा आणि लसूण वापरल्यानंतर त्याच्या साली (Peel) आपण थेट कचऱ्याच्या डब्यात (Dust Bean) फेकून देतो. मात्र, कांदा आणि लसूण प्रमाणे याच्या साली देखील उपयोगात आणता येतात. जाणून घेऊयात या सालींचे काय फायदे होतात. भातची चव वाढवण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये लसणाच्या साली घातल्यास भाताची चव आणखीन वाढते. याकरता कापडाच्या एखाद्या छोट्याशा पुरचुंडीमध्ये साली बांधून भातामध्ये पुरचुंडी ठेवा. भात शिजत आल्यानंतर यामध्ये घातलेल्या साली काढून टाका. अगदी टेस्टी भात तयार होतो. सूपसाठी वापरा कांदा आणि लसणाच्या सालीचा वापर सूप करण्यासाठी करू शकता. यामुळे पदार्थांची चव तर वाढतेच शिवाय पोषक घटकही शरीरामध्ये जातात. सूप तयार करून झाल्यावर गाळणीने गाळून घेऊ शकता किंवा चमच्याने बाजूला काढू शकता. (Vastu Tips: छोटे उपाय देतील मोठे फायदे; अडचणी संपून पैशाचा पडेल पाऊस) पदार्थाची चव वाढवण्यासाठी चव वाढवण्यासाठी कांदा आणि लसूण यांच्या साली भाजून त्याची पावडर करा. याचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी करता येऊ शकतो. याशिवाय सॅलडमध्ये वापरल्यामुळे फ्लेवर वाढतो. स्नायूंचा अवघडलेपणा दूर करण्यासाठी कांद्याच्या सालीमध्ये पोषक घटक असतात. याचा वापर करून स्नायूंचा अवघडलेपणा कमी करता येतो. एका भांड्यामध्ये एक कप पाणी गरम करा आणि त्यामध्ये कांद्याच्या साली घाला. हे पाणी गाळून प्यायल्यास त्रास कमी होतो. हे गुणकारी पाणी कॅन्सरच्या आजारातही उपयोगी येत. (मेडिटेशन करायला आवडतं, पण झोप येते म्हणून टाळता? टेन्शन नको; करा ‘हे’ उपाय) केसांसाठी कांद्यामध्ये सल्फर असल्यामुळे केसांसाठी फायदेशीर आहे. कांद्याच्या साली चार ते पाच कप पाण्यामध्ये उकळवा. केस शॅम्पूने धुतल्यानंतर या पाण्याचा वापर करा. झोपेसाठी कांद्याच्या साली चहा पावडर बरोबर उकळवा आणि हे पाणी गाळून घ्या. हे पाणी प्यायल्यामुळे मेंदू शांत होऊन झोपही चांगली लागते. कोलेस्ट्रॉल कमी करणे कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि ते पाणी सकाळी प्यायल्यास अनेक फायदे होतात. या पाण्याची टेस्ट चांगली नसली तरी यात साखर टाकून प्यायल्यास फायदा चवीत फरक पडतो. रोज याचे घेतल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. (हुंडा नाही-आंतरजातीय विवाहाला विरोध नाही!या पाड्यात आहे आदर्श घेण्यासारखी परंपरा) खाजेवर उपाय पायांना खाज येत असल्यास लसणाच्या साली पाण्यामध्ये उकळवा. या पाण्यामध्ये थोडावेळ पाय बुडवून ठेवा यामुळे खाज कमी होते. खत म्हणून वापरा कांद्याच्या साली मध्ये कॅल्शियम,पोटॅशियम,मॅग्नेशियम,आयर्न सारखे घटक असतात. त्यामुळे या साली उत्तम खत म्हणून वापरता येतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Easy hack, Home remedies, Lifestyle

    पुढील बातम्या