रोम, 25 ऑगस्ट : सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) जगभर थैमान घालतो आहे. या व्हायरसच्या विळख्यातून अद्यापही सुटका झालेली नाही की आता आणखी एका महासाथीच्या (Pandemic) संकटाचा इशारा देण्यात आला आहे. भविष्यात कोरोनापेक्षाही भयंकर महासाथ येऊ शकते (Pandemic in future), त्यामुळे यासाठी तयार राहायला हवं, असं आरोग्य तज्ज्ञांनी अलर्ट केलं आहे.
इटलीतील (Italy) पडुआ युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी एक अभ्यास केला आहे. यामध्ये 60 वर्षांनंतर आणखी एक महाभंयकर महासाथ पसरणार असल्याचं सांगण्यात आला आहे. 2080 मध्ये जगभर आणखी एक महासाथ येणार आहे ही कोरोनापेक्षाही भयंकर असणार आहे, असा इशारा देण्यात आलला आहे.
हे वाचा - COVID-19, Delta च्या भयंकर परिस्थितीवर पाश्चिमात्य माध्यमांनी भारताला धरलं धारेवर; पण अमेरिकेचं काय?
संशोधकांनी भविष्यात कोणती महासाथ येऊ शकते, याचा अभ्यास करण्यासाठी गेल्या 400 वर्षांत जगभरात पसरलेल्या अशा आजारांच्या संसर्गाचा अभ्यास केला. यामध्ये प्लेग, टाइफॉईड आणि काही नवीन फ्लू व्हायरसचाही समावेश होता. त्यांनी अभ्यास केलेल्या बहुतेक आजारांवर उपचारही उपलब्ध नाहीत.
संधोधकांच्या मते, महासाथी इतक्या दुर्मिळ नाही जितक्या पूर्वी होत्या. आगामी काळात महासाथी वाढण्याची शक्यता आहे. पुढील महासाथ 2080 पर्यंत येईल. कोरोनासारखी जगभर पसरणारी महासाथ कोणत्याही वर्षात येण्याची शक्यता जवळपास दोन टक्के आहे.
यामागील कारण स्पष्ट नाही. पण वाढती लोकसंख्या, आहारात बदल, पर्यावरणावरणातील बदल, माणूस आणि प्राण्यांमधील वाढता संपर्क ही यामागील कारण असू शकतात, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
हे वाचा - चिंता वाढली ! कोरोना सुपर व्हेरिएंट कोविड-22 हा कोविड-19पेक्षाही असू शकतो घातक
भविष्यात आणखी एका महासाथीची शक्यता वाढते आहे आणि आपल्याला भविष्यातील या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Italy, Pandemic, Serious diseases