नवी दिल्ली, 19 जून : भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा (Tea). कधीही कोणत्याही वेळेला भारतीय चहा पिऊ शकतात. चहाप्रेमी एक वेळ जेवणाशिवाय जगू शकतील, पण चहा न पिता जगणं त्यांच्यासाठी जवळपास कठीणच. चहांमध्ये हल्ली अनेक प्रकार समोर येत आहेत. वेगवेगळे मसाले वापरुन चहा बनवला जातो. तुम्ही चहाचे अनेक प्रकार करून पाहिले असतील पण पांढरा चहा घेतला (White Tea) आहे का? जर तुम्ही याबद्दल ऐकले असेल, तर तुम्ही हे ऐकले असेल की पांढरा चहा खूप महाग आहे. चला, जाणून घ्या पांढरा चहा म्हणजे काय आहे? या चहाचा उगम चीनमधून झाला आहे आणि आता भारतातही लोकप्रिय होत आहे.या वनस्पतीच्या कळ्या लवकर उपटल्या जातात, जिथे ते केसांसारख्या पांढर्या पंखांनी झाकलेले असतात आणि म्हणून त्यांना ‘व्हाइट टी’ असं नाव देण्यात आलं आहे. कॅमेलिया सायनेन्सिस या चहाच्या रोपाची नवीन पाने आणि कळ्या परिपूर्ण पांढरा चहा बनवण्यासाठी वाळवल्या जातात. हे ही वाचा - Health Tips: काकडी खा, मस्त राहा! काकडी खाण्याचे फायदे वाचा पांढऱ्या चहाचे फायदे - पांढरा चहा (White Tea Benifits)आरोग्य तसंच त्वचेसाठी पोषक मानला जातो. कारण यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं ( antioxidant) भरपूर प्रमाण असते. पांढऱ्या चहाचं सेवन करण्यास सुरुवात करा, यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पांढऱ्या चहामधील अॅंटी-ऑक्सिडेंट्सचे गुणधर्म आपल्या त्वचेतील पेशींना दुरुस्त करण्याचं कार्य करतात. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यात मदत होते. हे ही वाचा - World Sickle Cell Day 2022: लक्षणे अगदी कॉमन असलेला सिकल सेल आजार वेळीच ओळखा पांढऱ्या चहातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स (antioxidant) गुणधर्मामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारे सूज येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, मुरुम येणे किंवा कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्यापासून रोखतात. आपल्या शरीराची चयापचयाची (metabolism) प्रक्रिया सुधारुन मलाद्वारे विषारी घटक (toxins) बाहेर फेकण्याचे काम केलं जातं. चहातील औषधी गुणधर्मामुळे तुमच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणं किंवा सुरकुत्या दिसून येत नाहीत. चेहऱ्यावरील डागांचीही समस्या कमी होते. महत्त्वाचे म्हणजे या चहाच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉलतसंच रक्तदाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होते. पांढरा चहा वजन कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. हार्ट पेशंटसाठी हा चहा उत्तम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.