जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World Sickle Cell Day 2022: लक्षणे अगदी कॉमन असलेला सिकल सेल आजार वेळीच ओळखा

World Sickle Cell Day 2022: लक्षणे अगदी कॉमन असलेला सिकल सेल आजार वेळीच ओळखा

World Sickle Cell Day 2022: लक्षणे अगदी कॉमन असलेला सिकल सेल आजार वेळीच ओळखा

हिमोग्लोबिन शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, परंतु या आजारात या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे सिकलसेल अॅनिमिया, सिकलसेल थॅलेसेमिया यासह अनेक आजार सुरू होतात. याबाबत जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : दरवर्षी 19 जून रोजी ‘जागतिक सिकलसेल जागरूकता दिवस’ (World Sickle Cell Day 2022) साजरा केला जातो. ‘सिकलसेल’ आजाराबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. सिकलसेल हा एक असा आजार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनवर वाईट परिणाम करतो. यामुळे लाल रक्तपेशींचा (RBC) आकार खराब होतो आणि लोकांना अनेक समस्या येतात. या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचार सांगणार आहोत. सिकलसेल रोग म्हणजे काय? GSVM मेडिकल कॉलेज (कानपूर) येथील मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यापक आणि MD, डॉ. महेंद्र पाल सिंग म्हणतात की, सिकलसेल रोगामुळे रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये असामान्य Hb चेन तयार होतात. त्यामुळे लाल रक्तपेशींचा (RBC) आकार बिघडतो. हिमोग्लोबिन शरीरातील सर्व पेशींना पुरेसा ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते, परंतु या आजारात या कामात व्यत्यय येतो. त्यामुळे सिकलसेल अॅनिमिया, सिकलसेल थॅलेसेमिया यासह अनेक आजार होतात. यामुळे दीर्घकाळ गंभीर आजार होण्याचा धोका असतो, त्यामुळे वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. सिकलसेल रोगाची लक्षणे जाणून घ्या (SCD) - अ‌ॅनीमियामुळे थकवा जाणवतो - हाडांमध्ये वेदना - हात पाय सुजणे - संसर्ग होणे - डोळ्यांच्या समस्या - मुलांची वाढ नीट होत नाही हे वाचा -   आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास हा आजार कसा होतो? डॉ. महेंद्र पाल सिंह यांच्या मते, बहुतेक लोकांमध्ये हा आजार आनुवंशिक कारणांमुळे होतो. जर एखाद्याचे आई-वडील या आजाराच्या विळख्यात असतील तर त्या व्यक्तीला सिकलसेल आजार होण्याची शक्यता असते. कधीकधी सिकलसेल जीन्स एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात. याशिवाय काही कारणे आहेत, जी या आजाराचे कारण बनतात. या आजाराची कोणतीही लक्षणे दिसताच लोकांनी तत्काळ आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधावा. हे वाचा -  पावसाळा सुरू होताच मुलांना ताप भरतो; या 6 गोष्टींची घ्या नीट काळजी या रोगाचा उपचार काय आहे? डॉ. महेंद्र पाल सिंग म्हणतात की सिकलसेल अॅनिमियाने ग्रस्त असलेल्यांना वारंवार रक्त चढवावे लागते. या आजारात होणाऱ्या वेदनांवर हायड्रॉक्सी युरियाचा उपचार केला जातो. सिकलसेल रोगाच्या प्रतिबंधासाठी, विवाहापूर्वी जनुकीय समुपदेशन घेणे आवश्यक आहे. भविष्यात, जनुक थेरपी या आजारावर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या थेरपीने या आजाराची तीव्रताही कमी करता येते. मात्र, वेगवेगळ्या रुग्णांवर त्यांच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात