Home /News /lifestyle /

केसांना लावलेला रंग जरा जास्तच गडद वाटतोय? या उपायांनी करा कमी

केसांना लावलेला रंग जरा जास्तच गडद वाटतोय? या उपायांनी करा कमी

एकदा केसांना कलर लागला की तो सहज कमी करता येत नाही.

एकदा केसांना कलर लागला की तो सहज कमी करता येत नाही.

कधीकधी केसांवा लावलेला रंग जास्त डार्क (Dark Colour) झाला तर, फार विचित्र दिसायला लागतो. पण, तो सहज कमी करता येत नाही.

    नवी दिल्ली,31 जुलै : केस पांढरे (Greying Hair)  व्हायला लागले की आपल्याला त्यां केसांना रंगवण्यासाठी काहीना काही उपाय करावा लगतो. बरेच जण केसांना मेहेंदी किंवा हेयरर कलर लावतात. हल्ली केसांसाठी हाय लाईट्स हा पर्याय देखील ट्रेन्डमध्ये (Trend) आहे. पांढरे केस काळे (To Make White Hair Black) करण्यासाठी हेअर कलर्स (Hair Colors) वापरले जातात. केस काळे करणाऱ्या हेअर कलर्समध्ये केमिकल्स (Chemicals) असतात. त्यामुळे केसांच्या समस्या (Hair Problems) आणखीन वाढतात. कधीकधी केसांचा रंग लावतांना जास्त डार्क (Dark Colour) झाला तर फार विचित्र दिसायला लागतो. पण, एकदा केसांना कलर लागला की तो सहज कमी करता येत नाही. त्यामुळे तसंच वावरावं लागतं. घरीच काय पण, पार्लरमध्ये केसं रंगवल्यानंतर हवा तसा परिणाम दिसत नाही. पण तरीही, रंग कमी होईपर्यंत वाट पहावीच लागते. (कोरोना काळात चहा ठरेल Immunity साठी फायद्याचा, सकाळी अशाप्रकारे प्या Cup of Tea!) पण आता चिंता करी नका काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही केसांना लागलेला कलर कमी करु शकता. त्यासाठी फार मेहनतही घ्यावी लागणार नाही. घरात सहज मिळणाऱ्या लिंबाचा वापर करून कलर कमी करता येतो.  केसांचा कलर कमी करण्यासाठी लिंबाचा रस काढून घ्या. एक कप लिंबाच्या रसात अर्धा कप कंडिश्नर मिसळा. हे मिश्रण मिक्स करा. आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. स्प्रे बॉटल नसेल तरी काचेच्या भांड्यात ठेवा आणि ब्रशच्या सहाय्याने लावा. (पांढरं मध माहितेय? किती फायदेशीर आहे आरोग्यासाठी जाणून घ्या) या पद्धतीने करा वापर केसांचा गुंता काढा त्यानंतर केसांचे छोटेछोटे सेक्शन करून घ्या. आता या मिश्रणाचा केसांवर स्प्रे करा. स्प्रे बॉटल नसेल तर हेअर ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण स्कॅल्प आणि केसांच्या टोकापर्यंत चांगलं लावा. यानंतर,पुन्हा केस विंचरा आणि कमीतकमी 1 तासासाठी उन्हात बसा. मात्र त्वचेवर उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी सूर्यप्रकाशात बसण्यापूर्वी SPF 30 असलेलं सनस्क्रीन लोशन लावा. (लिंबू चांगलं रसाळ आहे का हे कसं ओळखायचं? खरेदी करतानाच सोप्या टिप्स वापरून पाहा) लिंबाच्या रसामध्ये असलेलृं सायट्रिक अ‍ॅसिड नैसर्गिकरित्या हेयर कलर कमी करण्यास मदत करेल. उन्हामुळे केसांवर लावलेलं मिश्रण सुकल्यानंतर केस कोमट पाण्याने चांगले धुवा. यानंतर,केसांवर कंडिश्नर लावा आणि 8 ते 10 मिनिटांनी केस कोमट पाण्याने पुन्हा धुवा. यानंतर केस हेवेवर वाळू द्या. केस पूर्णपणे सुकल्यानंतर केसांमध्ये मॉइश्चरायझिंग मास्क लावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Home remedies, Woman hair

    पुढील बातम्या