मुंबई, 18 ऑक्टोबर : दिवाळीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर विविध वस्तू, सेवांच्या खरेदी-विक्रीसाठी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे. दिवाळी निमित्त साडी खरेदीकडे महिलांचा ओघ वाढला आहे. बाजारपेठेत साड्यांचे विविध ट्रेंड उपलब्ध झाले आहेत. नवीन डिझाईनच्या साड्या दिवाळी संग्रह म्हणून विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. या दिवाळीसाठी कोणता स्पेशल साडीचा ट्रेंड मुंबई च्या दादर येथील बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे जाणून घेऊया. बाजारात कोणकोणत्या विशेष साड्या विक्रीसाठी आहेत? दिवाळीनिमित्त साड्यांचे विशेष संग्रह बाजारात दाखल करण्यात आले आहेत. पैठणी, सेमी पैठणी, कांजीवरम, ब्रोकेट सिल्क, रोज गोल्ड जरी, मलाई सिल्क, कलकत्ता सिल्क ई. प्रकारच्या साड्या या दिवाळीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेही वाचा : Diwali Shopping : यंदाच्या दिवाळीत करा राजेशाही दागिन्यांची खरेदी! पाहा लेटेस्ट ट्रेंड, Video साड्यांचा कोणता नवा ट्रेंड उपलब्ध आहे? मुंबईच्या दादर येथील प्रसिद्ध साडी बाजारपेठेत साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी गडद, धूपछाव रंगाच्या साड्या वापरल्या जायच्या. या वर्षी पुन्हा धूपछाव व गडद रंगांच्या साड्यांचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पैठणी, कांजीवरम, तसेच इतर साड्यांमध्ये फ्युजन करून असा नवा ट्रेंड ग्राहकांचं आकर्षण ठरतोय.
साड्यांच्या किंमती काय आहेत? खरं तर महागाई वाढल्यामुळे साड्यांच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. पैठणी 2000 पासून ते 50000 पर्यंत आहेत. तसेच इतर साड्या 500 रुपये ते 25000 पर्यंत उपलब्ध आहेत. हेही वाचा :
Diwali 2022 : मराठी तरुणाने सुरू केला eco-friendly आकाशकंदीलाचा व्यवसाय, पाहा Video डिझाईनर तसेच पारंपारिक नक्षीकामाच्या साड्यांना मागणी दोन वर्षानंतर या वर्षी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महागाई वाढली असली तरी सुद्धा ग्राहक येऊन साड्या नेत आहेत. डिझाईनर तसेच पारंपारिक नक्षीकामाच्या साड्यांना मागणी आहे, असं दादर रंगोली अनेक्सच्या दुकानाच्या कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.
गुगल मॅपवरून साभार