मुंबई, 17 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं की सोनं, सोन्याचे दागिने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दागिन्याच्या विविध डिझाईन्स बाजारात उपलब्ध होतात. नवे ट्रेंड्स येतात. या ट्रेंड्समधील वेगळेपण प्रत्येकजण शोधत असतो. सर्वसामान्यांची दागिन्यांची हौस आणि नाविन्याचा शोध लक्षात घेऊन दिवाळी च्या निमित्त नवे ट्रेंड बाजारात दाखल होत असतात. सध्या बाजारात सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या राजेशाही संग्रहाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईतील सराफांच्या दुकांनामध्ये दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण वेगवेगळे ट्रेंड सध्या पाहयला मिळत आहेत. त्यामधील राजेशाही ट्रेंड हा खास पसंतीला उतरतोय. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स या दुकानात राजेशाही संग्रहातील पद्मसंग्रह तयार केला आहे. कमळ हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच प्रत्येक दागिन्यात कमळाची आकर्षक डिझाईन बनवण्यात आली आहे. राजेशाही संग्रह म्हणजे काय? पूर्वीच्या काळी कोणते दागिने कसे घातले जायचे त्याचे वजन किती असायचे तसेच त्या दागिन्यातले बारकावे यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आला आहे. या दागिन्यांना नव्या फॅशननुसार तयार करण्याची संकल्पना आहे. सध्या कमी वजनाच्या दागिन्यांना मागणी असल्यामुळे त्या दागिन्यांना कमी वजनात तयार करून अँटिक टच दिला जातो. बांगड्या, मंगळसूत्र, हार यासारख्या आकर्षक वस्तू घडवल्या जातात. धनत्रयोदशीला कोणत्या मुहूर्ताला Gold खरेदी करणं ठरेल शुभ? इथं पाहा ‘सुवर्णवेळ’ पद्मसंग्रह काय आहे? पद्म म्हणजे कमळ आणि याचाच समावेश राजेशाही संग्रहात करण्यात आला आहे. कमळाच्या नक्षीतले मंगळसूत्र, हार, बांगड्या, कानातले उपलब्ध आहेत. मराठमोळ्या दागिन्यांना मागणी! पैठणी म्हटली म्हणजे ठुशी तर हवीच त्यामुळे ठुशी, पारंपारिक बांगड्या, नथ, झूमका या दागिन्यांना सुद्धा मागणी आहे. यावर्षी ग्राहक इतरांपेक्षा वेगळ्या नक्षीकाम केलेल्या दागिन्यांच्या शोधात आहेत. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर तयार केलेला आमचा पद्मसंग्रह त्यांना चांगलाच भावलाय. तसेच या वर्षी आम्ही पॉकेट फ्रेंडली हिऱ्यांचे दागिने विक्रीसाठी ठेवले आहेत. Diwali 2022 : मुंबईतील चिवडा बाजारात काय आहे मस्त? पाहा VIDEO आजच्या पिढीला, नवा जॉब सुरु केलेल्या लोकांना त्यांच्या बजेट मध्ये बसेल असे हिऱ्यांचे दागिने आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. असं जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे मालक अभिषेक पेडणेकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.