भोपाळ, 02 जुलै: आधी कोरोना, त्यातून बरं झाल्यावर ब्लॅक फंगस आणि आता ब्लॅक फंगसमधूनही (Black fungus) बरं झालेल्या रुग्णांना ऑस्टियोमोलाइटिस बळावला आहे. हा दुर्मिळ असा आजार आहे. यामुळे रुग्णांचा तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्याची हाडं सडू लागली आहे. या ऑस्टिओमोलाइटिस (Osteomyelitis) असं म्हटलं जातं. भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात ऑस्टिओमोलाइटिसची 20 पेक्षा जास्त प्रकरणं आढळून आली आहे. त्यापैकी कित्येकांचे जबडे काढून टाकावे लागले आहेत. ब्लॅक फंगसमुळे रुग्णाच्या तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबड्यांच्या रक्तपेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. यामुळे हाडांपर्यंत जाणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि मग हाडं सडू लागतात. मग ही सडलेली हाडं ऑपरेशन करून काढावी लागतात. तोंडाच्या वरील भाग आणि जबडाही काढून टाकावा लागतो. रुग्णांना खाण्यापिण्यातही त्रास होतो. हे वाचा - OMG! या गोड चिमुकलीचं नाजूक शरीर हळूहळू बनतंय ‘दगड’; भयानक आजाराने ग्रासलं जबड्याच्या वरील भागात सूज, दात अचानक हलू लागणं, दातांमध्ये वेदना, हिरड्यांमधून पू येणं सोबतच पांढरे पुरळ येणं. वरील ओठ बधीर होणं. तोंडाच्या आत वरील भागाची त्वचा सडू लागल्याने ती गळू लागते. डॉक्टरांनी सांगितलं, हा नवा आजार नाही. पण कित्येक वर्षात याची एक-दोन प्रकरणंच पाहायला मिळायची. अचानक ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढलीआणि सोबतच या आजाराच्या प्रमाणातही वाढ होते आहे. हे वाचा - Heart Attack मुळे मंदिराने गमावला आपला नवरा; कुणालाही हार्टअटॅक येताच करा 5 उपाय दैनिक भास्कर च्या रिपोर्टनुसार हमीदियातील दंतरोग विभागाचे अध्यक्ष डॉ. अनुज भार्गव यांनी सांगितलं की, हा आजार गेल्या 50 वर्षांत एक हजारांपैकी फक्त 0.14 लोकांना व्हाययचा. आता या आजाराची प्रकरणं वेगाने समोर येत आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचं वाढलेलं प्रमाण. कित्येकांच्या तोंडाच्या आतील वरील भाग आणि जबडा कापून वेगळा करावा लागत आहे. हमीदियामध्ये काही दिवसांतच ऑस्टियोमोलाइटिसग्रस्त 10 पेक्षा जास्त रुग्णांचं ऑपरेशन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.