नवी दिल्ली, 02 जुलै : भारतात प्रेग्नंट महिलांच्या कोरोना लसीकरणाचा (Pregnant woman corona vaccination) मार्गही मोकळा झाला आहे. मोदी सरकारने गरोदर महिलांना कोरोना लस (Corona vaccination in pregnancy) घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी ही तज्ज्ञ समितीची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्य केल आहे. त्यामुळे आता गर्भवती महिलाही कोरोना लस घेऊ शकतात.
प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्यावी, अशी शिफारस NTAGI ने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. ज्याला मंजुरी मिळाली आहे. प्रेग्नंट महिलांना कोरोना लस घ्यायची असल्यास त्यांना कोविन (CoWIN) पोर्टलवर नोंदणी करावी. किंवा त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेण्याचा पर्यायही त्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गर्भवतींनी लसीकरण करून घेणं हे त्यांच्या गर्भातल्या बाळांच्या आरोग्यासाठीही हितकारक आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19बाधित गर्भवतींना झालेल्या बाळांपैकी 95 टक्के बाळांचं आरोग्य जन्मतः चांगलं होतं; मात्र काही कोरोनोबाधित गर्भवतींच्या बाबतीत वेळेआधी बाळांचा जन्म होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे बाळाचं वजन 2.5 किलोपेक्षा कमी असू शकतं आणि काही दुर्मीळ केसेसमध्ये बाळाचा जन्माआधीच मृत्यू होऊ शकतो.
हे वाचा - ...तरी आपण सुरक्षित नाही, धोका कायम; मोदी सरकारने राज्यांना केलं सावध
अन्य व्यक्तींप्रमाणेच गर्भवती महिलांनाही लसीकरणानंतर काही साइड इफेक्ट्स जाणवू शकतात. त्यात सौम्य ताप, इंजेक्शनच्या जागी वेदना किंवा एक ते तीन दिवस अस्वस्थता आदी लक्षणांचा समावेश आहे. दीर्घकालीन साइड इफेक्ट्स आणि बाळासाठी लशीची सुरक्षितता यांबद्दल अद्याप अभ्यास झालेला नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
काही दुर्मिळ केसेसमध्ये, डोस घेतल्यानंतरच्या 20 दिवसांत गर्भवती महिलांना श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं वगैरे त्रास होतात. एक ते पाच लाख व्यक्तींपैकी एका व्यक्तीला असा त्रास होऊ शकतो. त्या केसमध्ये तातडीने उपचारांची गरज असते.
हे वाचा - लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस, राज्यात क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा
कोविड-19 टाळण्यासाठी बाकीच्या सर्वांना ज्या पद्धतीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याच पद्धतीने गर्भवती महिलांनीही काळजी घ्यावी आणि लसीकरणही करून घ्यावं, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Pregnant woman