“मी 30 वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी माझं लग्न झालं. माझं लव्ह मॅरेज. माझी बायको आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करतो. ऑफिसमध्ये ती माझ्यापेक्षा सीनिअर पोझिशनवर आहे. त्यामुळे तिला पगारही माझ्यापेक्षा जास्त आहे.. आमच्या कुटुंबापेक्षा तिची लाइफस्टाइलही वेगळी आहे. पण तरी आम्हा दोघांच्या नात्यावर त्याचा तसा फारसा फरक नाही. पण माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे नातेवाईक, माझे फ्रेंड्स माझी बायको माझ्यापेक्षा जास्त कमवते म्हणून मला चिडवडतात, माझी खिल्ली उडवतात. मी माझ्या बायकोवर कसा अवलंबून आहे, असं सांगितलं जातं. घरात ती जास्त कमावती म्हणून तिला ‘मॅन ऑफ द हाऊस’ म्हटलं जातं.” “तसं मी हे फार गांभीर्याने घेत नाही. मजेत घेतो. पण तरी कधी कधी ते असं बोलतात की मनाला ते टोचतं. मग मलाही माझी बायको जास्त कमवते म्हणून असुरक्षित असल्यासारखं वाटतं. मी काय करू?”
मुंबईतील मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे - “आपल्याकडे सर्वसाधाणरणे माणसांची किंमत पैशांवरून ठरवली जाते. पैसे कमवणं म्हणजे पॉवर, जो जास्त कमवतो त्याच्याकडे जास्त पॉवर असं मानलं जातं. त्यामुळे बायको नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असेल तर तिच्याकडे जास्त पॉवर म्हणून त्या पुरुषाला चिढवलं जातं. पण या परिस्थितीला फक्त पुरुषांनाच नव्हे तर महिलांनाही सामोरं जावं लागतं. म्हणजे बऱ्याचदा महिलांनाही यावरून सुनावलं जातं. ‘तुझा नवरा तुझ्यापेक्षा कमी पैसे कमवतो’, ‘त्यामुळे तो सक्षम नाही’, असं तिला म्हटलं जातं.” हे वाचा - Life@25 : लग्नाला वर्ष झालं नाही की सर्वांना आता हवी ‘गूड न्यूज’; त्यांना हँडल कसं करायचं? “खरंतर असे लोक त्यांची मानसिकता, जडणघडण दाखवून देतात. त्यामुळे कुणी तुम्हाला असं म्हटलं तर बरं बाबा तू म्हणतोस तो ठिक, तुला जे वाटतं ते ठिक, असं म्हणून विषय सोडून द्या. त्याची फार समजूत काढत बसू नका त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका, किंबहुना त्यांच्याकडे दुर्लक्षच करा. यामुळे त्यांच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमची यावरील प्रतिक्रिया पाहून, तुम्हाला याचा काहीच फरक पडत नाही हे लक्षात आल्यावर कदाचित ते लोकसुद्धा काही दिवसांनी असं बोलणं बंद करतील” हे वाचा - Life@25 : “लग्न करेन तर त्याच्याशीच तेसुद्धा आईबाबांच्या परवानगीनेच; पण जमायचं कसं?” राहिला प्रश्न तुमचा तर सर्वात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही एकमेकांशी लग्न केलं आहे. संसार तुम्ही एकत्र मिळून करत आहात. त्यामुळे कोण किती कमावतं यापेक्षा तुम्ही दोघं कुटुंबाला देत असलेलं योगदान महत्त्वाचं आहे. म्हणून लोक काय म्हणतात याकडे फार लक्ष देऊ नका"