मी 26 वर्षांची आहे. लग्नाचं वय झालं म्हणून आईवडिलांनी लग्नासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. पण माझा बॉयफ्रेंड आहे. गेली पाच वर्षे आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. माझे पालक त्याला ओळखतातही पण फक्त मित्र म्हणून. माझा तसा अजून लग्नाचा विचार नव्हता त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी आमच्या नात्याबाबत त्यांना सांगेन असं ठरवलं होतं आणि आता ती वेळ आली होती. कारण माझे पालक माझ्या लग्नाचा विचार करत आहेत. जेव्हा मला याबाबत समजलं तेव्हा मी त्यांना मी एका मुलावर प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करायचं असल्याचं सांगितलं. त्यांनी मुलाबाबत विचारलं मी त्याच्याबाबत सांगितलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. माझा बॉयफ्रेंड त्यांना बिलकुल आवडत नसल्याचं ते म्हणाले आणि त्याच्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाही असं त्यांनी सांगितलं. “मला माझ्या आईवडिलांची इच्छा मोडायची नाही, त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करायचं नाही पण मला तितकंच माझ्या बॉयफ्रेंडलाही सोडायचं नाही आणि माझ्याही इच्छेविरुद्ध लग्न करायचं नाही आहे. लग्न करेन तर त्याच्याशत तेसुद्धा आईबाबांच्या परवानगीनेच. पण हे जमायचं कसं? मी करू तर काय करू?”
मुंबईच्या वॉक्हार्ट रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ सोनल आनंद - “ही स्थिती नक्कीच तुम्हाला काळजीत टाकणारी आहे. कारण तुम्ही लग्नासाठी जोडीदाराची निवड केलेली आहे. परंतु, तुमच्या आई-वडीलांना हे नाते पसंत नसून तुम्ही दुसऱ्याशी लग्न करावे अशी तुमच्या पालकांची इच्छा आहे. अशा स्थितीत गोंधळून न जाता आई-वडीलांना समजावण्याचा प्रयत्न करा" “तुमची निवड कशी योग्य आहे, हे त्यांना पटवून द्या. आई-वडील समजून घेत नसतील तर कुटुंबातील अन्य सदस्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा. किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या पालकांना तुमच्या पालकांशी बोलण्यास सांगण्यास आणि सर्व शंका दूर करण्यास सांगू शकता” हे वाचा - Digital Prime time : ब्रेकअप के बाद! “ती मुव्ह ऑन झाली पण मी तिला विसरू शकलो नाही” “हे सर्व करण्यापूर्वी, फक्त 100% खात्री करा की तुमचा जोडीदार आणि तुम्ही एकाच पृष्ठावर आहात आणि तुमच्या नात्याबद्दल पुरेशी स्पष्टता ठेवा. तरच पुढे जावे. तुमचा वेळ घ्या, घाई करू नका आणि परिस्थितीला सामोरे जाताना शांत राहण्याचा प्रयत्न करा”