मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /व्यायाम न करताही करू शकता वजन कमी; खाण्याच्या या 5 चुकीच्या सवयी ताबडतोब सोडा

व्यायाम न करताही करू शकता वजन कमी; खाण्याच्या या 5 चुकीच्या सवयी ताबडतोब सोडा

Weight loss tips: आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता. याविषयी जाणून घेऊया.

Weight loss tips: आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता. याविषयी जाणून घेऊया.

Weight loss tips: आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता. याविषयी जाणून घेऊया.

मुंबई, 15 जून : वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे तर असते, पण अनेकांना त्यासाठी हार्ड वर्क करायचे नसते. कित्येकांना वजन कमी करायचं असतं पण वर्कआउट्सचा कंटाळा येतो किंवा विविध कारणांनी करता येत नाही. अशा परिस्थितीत वजन कमी करणं हे स्वप्नवत वाटतं. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, जर आपण हार्ड वर्क न करता वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ते प्रत्यक्षात शक्य आहे. यासाठी आपण खाण्याच्या सवयी सुधारू शकत असाल तर तुम्ही हे करू शकता. ExactDite ने दिलेल्या माहितीनुसार, आपण आपल्या आहारात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश थोडा काळजीपूर्वक केला आणि काही खाण्याच्या सवयींमध्ये बदल केला तर कोणत्याही व्यायामाशिवाय आपण वजन कमी करू (Worst Eating Habits For weight gain) शकता.

गोडाची लालसा –

वास्तविक, जेव्हा आपण काहीतरी गोड खातो तेव्हा आपल्याला छान वाटते आणि आपण ते 2 ऐवजी 4 खातो. यामुळे तुमची जेवणाची लालसा वाढते, त्यामुळे तुमच्या कंबरेचा आकारही वाढतो. जर तुम्ही गोड खाण्याची सवय बदलली तर तुमचे वजन आपोआप कमी होईल.

स्ट्रेस ईटिंग –
तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोक स्ट्रेस ईटिंगच्या आहारी जातात आणि भूक लागलेली नसतानाही खात राहतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ताणतणावात हेल्दी फूड्सऐवजी लोक फास्टफूड आणि अस्वास्थ्यकर पदार्थ जसे की आइस्क्रीम, कुकीज, चॉकलेट, चिप्स, फ्रेंच फ्राईज आणि पिझ्झा खातात. हे पदार्थ वजन वाढवण्याचे काम करतात. हे पदार्थ टाळल्यास आपण वजन झपाट्याने कमी करू शकतो.

हे वाचा – Googleने बॅन केले Login-IDचोरी करणारे Apps,लगेच डिलीट करुन बदलाFacebook Password

निष्काळजीपणे खाणे –

अनेकदा कंटाळा येतो आणि मग काही करायचं नसतं, अशावेळी लोकांना खायला आवडते. बरेच लोक विशेषतः टीव्ही पाहताना, फोन कॉल इत्यादींमध्ये निष्काळजीपणे खात राहतात. वास्तविक, आपल्या बेफिकीर खाण्याच्या सवयींमुळे आपले वजन वाढते. आजच या सवयी सोडा.

फास्ट खाणं –

काही लोक चावल्या-चघळल्याशिवाय अन्न पटकन गिळतात आणि जेवणाचं काम पटकन फिन्निश झाल्याचं समजतात. वास्तविक, मेंदूला आपले पोट भरले आहे हे समजण्यासाठी 20 मिनिटे लागतात, पण काहीजण 5 मिनिटांत जेवतात, असे केल्याने पुन्हा पुन्हा भूक लागते.

हे वाचा – घरबसल्या असे बनवा तुमचे मतदान ओळखपत्र, Online च्या सर्व स्टेप जाणून घ्या

नाश्ता न करणं –

बरेच लोक सकाळी लवकर काही खात नाहीत. असं करणं चुकीचं आहे, सकाळी वेळेत खाल्ल्याने आपले चयापचय सुधारते आणि आपली रक्तातील साखर सुरळीत राहते. वजन कमी करण्यासाठीदेखील ते आवश्यक आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Weight, Weight loss tips