Home /News /lifestyle /

राष्ट्रीय पोषण सप्ताह: कोणत्या वयात कसा असावा आहार? वेगवेगळा असतो परफेक्ट Diet Plan

राष्ट्रीय पोषण सप्ताह: कोणत्या वयात कसा असावा आहार? वेगवेगळा असतो परफेक्ट Diet Plan

वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक आहाराचा समावेश असणं गरजेचं असतं. तुमच्या वयानुसार ठरवा परफेक्ट डाएट प्लॅन

मुंबई, 7 सप्टेंबर शरीराचं पोषण (Nutrition week) हा शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आपण वेगवेगळे पदार्थ खातो, त्यात आपल्या रसनेला म्हणजेच जिभेला तृप्त करणं आणि पोट भरणं हे हेतू असतातच; पण शरीराचं पोषण हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. शरीराचं पोषण चांगलं होणं हे आपण घेत असलेल्या आहारावर (Diet plan) अवलंबून असतं. पोषणातूनच आपल्याला ऊर्जा (Energy) मिळते, आपली कार्यक्षमता वाढते आणि टिकून राहते, तसंच रोगप्रतिकारशक्तीही (Immunity) वाढते. 'खाशील तसा होशील' अशी एक म्हण आहे. तिचा भावार्थ असा, की आपण जे काही खातो, त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. चांगलं, पौष्टिक खाल्लं, तर साहजिकच प्रकृती सुदृढ राहते. म्हणूनच पोषण या संकल्पनेबद्दलची जागरूकता वाढीला लागण्यासाठी दर वर्षी एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) साजरा केला जातो. कोरोनाच्या कालखंडात तर पोषणाचं महत्त्व कळणं अधिकच महत्त्वपूर्ण झालं आहे. प्रत्येक वयानुसार शरीराची रचना, शरीराकडून केली जाणारी कामं आणि वाढीचे टप्पे बदलत जातात. त्यामुळे साहजिकच शरीराला आवश्यक असलेल्या पोषणाच्या गरजांमध्येही बदल होत जातो. म्हणूनच वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांमध्ये आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक आहाराचा समावेश असणं गरजेचं असतं. 'झी न्यूज'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे. वयानुसार आहार बदला वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींच्या पोषणासाठी काय उपयुक्त ठरू शकतं, याची ढोबळ माहिती आपण घेऊ या. ही माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ला नव्हे, तर केवळ मूलभूत माहिती आहे. स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही आपण आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून योग्य तो आहार निश्चित करू शकता. ज्येष्ठांचा आहार आपल्याकडे नोकरीतून निवृत्त होण्याची वयोमर्यादा साधारण 60 वर्षांची आहे. कारण त्या वयानंतर शरीराची क्षमता कमी होत जाते. पचनक्षमतेवरही परिणाम होतो. वयाच्या या टप्प्यात शरीराला मायक्रो न्यूट्रिएंट्स (Micro Nutrients) अर्थात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू शकते. तसंच प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू दुखावू शकतात, हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, प्रथिनं आदींचा आहारात समावेश असणं वयाच्या या टप्प्यात महत्त्वाचं ठरतं. हे लक्षात घेऊन सूप, डाळी, कडधान्यं, भाजीपाला आदींचा आहारात समावेश असणं श्रेयस्कर ठरतं. 20 पर्यंत वाढीला अनुकूल आहार वयाचा 60 वर्षांनंतरचा टप्पा जसा महत्त्वाचा, तसाच जन्मापासून 20 वर्षांपर्यंतचा टप्पाही महत्त्वाचा. कारण. हा कालावधी असतो शरीराच्या वाढीचा. याच कालावधीत माणसाचा शारीरिक आणि मानसिक विकास (Physical & Mental Growth) होतो. त्यामुळे या वयात आहाराद्वारे ऊर्जा मिळणं अत्यंत आवश्यक असतं. मेंदूच्या विकासासाठी प्रथिनं, इसेन्शियल फॅटी अॅसिड्स, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक आदींनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा बालकांच्या आणि नवयुवकांच्या आहारात समावेश हवा. लहान मुलं पौष्टिक खाद्यपदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात. उच्च रक्तदाबाची (High BP) सर्वसाधारण दिसणारी ही लक्षणं तुम्हाला माहीत आहेत का? त्यामुळे सँडविच, रोल्स आदींच्या माध्यमातून त्यांना पौष्टिक पदार्थ देणं ही एक चांगली कल्पना ठरू शकते. विशी ते चाळिशीतला टप्पाही महत्त्वपूर्ण असतो. कारण या वयात माणूस सर्वाधिक धडपड करत असतो. उच्च शिक्षण, करिअर ठरवण्यासाठी, त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी त्याची बरीच शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते. त्यामुळे या वयातल्या व्यक्तींनी पुढच्या काळातल्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य अन्नपदार्थांचं सेवन केलं पाहिजे. पुरुषांना अधिक ऊर्जेची (Energy Level) गरज असते. त्यामुळे अधिक ऊर्जादायी अन्नपदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश हवा. महिलांना लोहाची (Iron) गरज जास्त असते. त्यामुळे या वयातल्या महिलांनी प्रोटीन्स, फॅटी अॅसिड्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि फॉलिक अॅसिड आदींनी समृद्ध असलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. चाळिशीतला आहार चाळिशी ते साठी हा टप्पाही महत्त्वपूर्ण असतो. कारण या वयात माणूस करिअरच्या टप्प्यावर, तसंच कौटुंबिक पातळीवरही सेटल झालेला असतो. त्याच वयात त्यांच्यात मेटाबॉलिक चेजेंसदेखील (Metabolic Changes) होत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असलेल्या पोषक तत्त्वांची गरज बदलत जाते. या वयात हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश हवा, असं तज्ज्ञ म्हणतात. पचनक्षमता, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी फायटोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स आदींचा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असला पाहिजे. वयानुसार हाडं ठिसूळ होणं, उच्च रक्तदाब, हृदयरोग, डायबेटीस आदी विकार होऊ शकतात. म्हणून संतुलित आहाराची सर्वाधिक गरज या वयोगटाला असते. नट्स, अॅव्होकॅडो, पालक, बेरीज आदींचा आहारात अवश्य समावेश असू द्यावा. उपाशीपोटी चुकूनही करू नका ही 6 कामं; आरोग्यावर होईल वाईट परिणाम एकंदरीतच वयोगट कोणताही असो, आहार संतुलित असेल, तर सर्वसाधारणपणे पोषणाच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात. आपल्या डॉक्टरांशी किंवा डाएटिशियनशी चर्चा करून नेमका आहार ठरवता येऊ शकतो.
First published:

Tags: Food, Health

पुढील बातम्या