common symptoms of high blood pressure : उच्च रक्तदाबाची लक्षणं सहसा समजणं कठीण आहे. कारण जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हाच ती पूर्णपणे समजू लागतात. पण काही गोष्टींच्या आधारे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. येत्या काळात तुम्हाला या गंभीर आजाराचा धोका आहे की नाही, हे काही बाबींवरून समजू शकते. यूकेमध्ये, NHS च्या अंदाजानुसार 25 टक्के प्रौढांना उच्च रक्तदाबाचा धोका आहे. उच्च रक्तदाबासाठी तुमचा आहार आणि तुमची आरामदायी जीवनशैली जबाबदार असू शकते. उच्च रक्तदाबाला (high blood pressure) हायपरटेन्शन असेही म्हणतात. यामुळे, रक्तवाहिन्यांवर अधिक दबाव पडतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. डोकेदुखी डोकेदुखी ही आजच्या जीवनात एक अतिशय सामान्य समस्या आहे. ती बदलते हवामान, तणाव आणि डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते. परंतु, पुन्हा-पुन्हा होणारी तीव्र डोकेदुखी उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. पाणी पिऊन आणि विश्रांती घेतल्यानं डोकेदुखी दूर होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीपी उच्च किंवा कमी, दोन्हीमुळे डोकेदुखी होते. उच्च रक्तदाब जितका गंभीर असेल तितकाच डोकेदुखीचा त्रास जास्त होईल. उच्च रक्तदाबाचा धोकादायक पातळीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मळमळ रक्तदाब रोगात अचानक झालेल्या बदलामुळे मळमळ होऊ शकते. वास्तविक, रक्तदाबातील बदलांचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो. काही लोकांना असे वाटते की त्यांचे पोट खराब झाले आहे. बीपीमध्ये चढ -उतारांमुळे ही समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. हे वाचा - Shocking! तरुणीच्या मृतदेहासोबत लावलं लग्न; समोर आलं धक्कादायक कारण घाम येणे तणावामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे पॅनीक अटॅक किंवा एंडाइटी देखील होऊ शकते. उच्च रक्तदाबाच्या या प्रकारात खूप घाम येतो किंवा नसांमध्ये मुंग्या येतात. शरीरातील एड्रेनालाईन केमिकलच्या पातळीत तीव्र चढउतार झाल्यामुळे हे लक्षण उद्भवू शकते. धाप लागणे श्वास घेण्यात अडचण जाणवणे, हे देखील रक्तदाब वाढण्याचे लक्षण आहे. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीतील चढउतारांमुळे असू शकते. शरीरात रक्त परिसंचरण करण्यासाठी हृदय जबाबदार आहे. याद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचणारे रक्तही स्वच्छ होते. जेव्हा बीपी वाढतो तेव्हा हे रक्ताभिसरण विस्कळीत होते. यामुळे, श्वास घेणे कठीण होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.