Home /News /lifestyle /

स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही

स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

स्वयंपाक करताना अगदी छोट्याशा चुकांमुळे पदार्थांतले पोषक घटक नष्ट होतात.

मुंबई, 03 सप्टेंबर : आजकाल प्रत्येक जण आरोग्याबाबत (Health) अधिक दक्ष झाला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाल्यानं आहारात आवर्जून पौष्टिक पदार्थांचा (Nutritional Food) वापर केला जात आहे. यामुळे आजारांना दूर ठेवता येतं, तसंच वजनही नियंत्रणात राहतं. यासाठी स्वयंपाक (Cooking) करताना पदार्थांमधली पोषणमूल्यं टिकून राहतील याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अनेक वेळा आपण स्वयंपाक करताना काही छोट्या-मोठ्या चुका (Cooking Mistakes) करतो. त्यामुळे पदार्थांतले पोषक घटक नष्ट होतात. हे टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेक गृहिणींना स्वयंपाक करताना तेल (Cooking Oil) सढळ हाताने वापरण्याची सवय असते; मात्र तेलाच्या अती वापराने पदार्थातले पोषक घटक कमी होतात. तेलाचा वापर कमी करण्यासाठी चमच्याऐवजी स्प्रे वापरणं उपयुक्त ठरेल. हे वाचा - हे पदार्थ उपवास काळात टाळाच; वाढेल अ‍ॅसिडिटी, होतील पोटाचे विकार अनेक भाज्यांच्या सालींमध्ये अनेक पोषक घटक असतात; पण आपण त्या भाजीची सालं काढून टाकून देतो. त्याऐवजी ज्या भाज्या सालांसकट खाता येतात त्या सालासकटच खाणं अधिक लाभदायी ठरतं. भाजीची सालं सरसकट न काढता हलक्या हाताने तासली, तर त्याचा फायदा होईल. भाज्या शिजवताना कमी पाणी वापरावं आणि भाज्या जास्त वेळ उकळू नयेत. त्यामुळे त्यातली पोषणमूल्यं नष्ट होतात. भाज्या (Vegetables) शक्यतो वाफेवर शिजवणं जास्त चांगलं. काही भाज्या किंवा सूपमध्ये क्रीम (Cream) घालण्याची पद्धत आहे; मात्र मलईऐवजी लो फॅट दही, लो फॅट दूध किंवा कॉर्न स्टार्च वापरणं अधिक फायदेशीर होईल. स्वयंपाकासाठी ऑलिव्ह, कॅनोला तेलासारख्या मोनोअनसॅच्युरेटेड तेलाचा (monosaturated Oil) वापर करणं अधिक योग्य आहे. हे वाचा - Tandoori Roti वर ताव मारताय तर सावध व्हा! हे आहेत भयंकर Side Effects मिठाचा (Salt) अती वापरही घातक असतो. त्यामुळे स्वयंपाक करताना मीठ कमी वापरावं. मिठाला पर्याय म्हणून ऑलिव्ह तेल, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरावा. डबाबंद भाज्यांमध्येही अतिरिक्त मिठाचा वापर केला जात असल्याने ताज्या भाज्यांचाच वापर करावा. त्याचप्रमाणे साखरेचा (Sugar) वापरही कमी करावा. साखरेमुळे वजन वाढण्यासह अन्य काही तक्रारीही उद्भवतात. त्यामुळे स्वयंपाक करताना तेल, मीठ, साखर यांचा वापर कमीत कमी करण्यावर भर देणं आवश्यक आहे. तसंच अन्नपदार्थ जास्त शिजवणं, पॅक्ड फूडचा वापर करणं, फॅटयुक्त पदार्थांचा वापर करणं टाळल्यास आपला आहार अधिक पौष्टिक आणि संतुलित करणं शक्य होईल. त्यामुळे आरोग्यासाठी आहार लाभदायी ठरेल.
First published:

Tags: Food, Lifestyle

पुढील बातम्या