Home /News /lifestyle /

उपाशीपोटी चुकूनही करू नका ही 6 कामं; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

उपाशीपोटी चुकूनही करू नका ही 6 कामं; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

पावसाळ्यात पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ले तर, पचनाच्या समस्या निर्माण होतात.

पावसाळ्यात पचण्यास जड असलेले पदार्थ खाल्ले तर, पचनाच्या समस्या निर्माण होतात.

आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचं परिणाम किती भीषण असू शकतात याचा अंदाज तुम्ही समोर येणाऱ्या बातम्यांवरुन लावू शकता.

    सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेच्यावेळी जेवण, नाष्टा करणे याकडे दुर्लक्ष होतं. कामाच्या व्यापात आता जेवू, नंतर खाऊ अशी चालढकल करीत भूक मारली जाते. काहीवेळा काही कामे उपाशीपोटी (hunger) केली जातात. अन् हीच गोष्ट आरोग्यासाठी नेमकी घातक (Dangerous) आहे. उपाशीपोटी (empty stomach) राहण्याचे इतर तोटेही आहेत. निरोगी राहण्यासाठी, निरोगी आहारासह वेळेवर खाणं (Health Tips) खूप महत्वाचं आहे. संशोधकांच्या मते, वेळेवर न खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे पुढे जाऊन मोठा आजार होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी कोणताही पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. अशा स्थितीत सकाळच्या जेवणाबाबत काही नियम आहेत. तसेच, रिकाम्या पोटी कोणती कामे करू नयेत, हे देखील लक्षात घ्यावे. टाइम्स नाऊ हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना एक कप चहा (tea)लागतो. सकाळी सकाळी चहाचा एक घोट स्वर्गसुख देऊन जातो. पण या चहाच्या एका घोटामुळे आरोग्याला किती हानी पोहोचते, याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाहीत. उपाशी पोटी कॉफी किंवा चहा प्यायल्याने अॅसिडिटी (acidity ) होऊ शकते. ही सवय पुढे आरोग्याच्या दृष्टीने मोठी घातक ठरू शकते. हे ही वाचा-हे पदार्थ उपवास काळात टाळाच; वाढेल अ‍ॅसिडिटी, होतील पोटाचे विकार उपाशीपोटी दारू प्यायल्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात, असे संशोधकांचे मत आहे. याचा परिणाम म्हणजे उष्णता, वेदना, रक्तदाबाची समस्या, मूत्रपिंड, फुफ्फुसं, यकृत आणि मेंदूतील विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे रिकाम्या पोटी दारू पिण्याची सवय असेल, तर ती बदलणे गरजेचे आहे. उपाशीपोटी च्युइंगम चघळण्याची अनेकांना सवय असते. अशा सवयी पचनशक्तीला कमकुवत करू शकतात. त्यामुळे पोटाशी संबंधित आजार देखील होऊ शकतात. उपाशी पोटी खरेदी करताना अनेक अनावश्यक गोष्टींची खरेदी केली जाऊ शकते. उपाशी असल्याने आवश्यकतेपेक्षा जास्त खरेदी करण्याबरोबरच जंक फूड देखील खाल्ले जाते. जर उपासमारीची सवय सोडली तर अनेक आजार आणि लठ्ठपणाची समस्या टाळता येऊ शकते. पोटात अन्नाचा कण नसेल तर माणूस रागवतो, चिडतो त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी बिघडते. अशा वेळी ब्लॅड प्रेशर (blood pressure) देखील वाढू शकतं. उपाशीपोटी कोणतंही औषध घेणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुम्ही उपाशीपोटी एंटी-इंफ्लेमेटरी औषधे घेतली, तर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने हानी पोहोचण्याची शक्यता असते. भूकेकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी हानिकारक आहेच. परंतु उपाशीपोटी राहणे हे तुमच्या कार्यक्षमतेसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे नेहमी वेळच्यावेळी योग्य आहार घेणं गरजेचं आहे.
    First published:

    Tags: Food, Health, Health Tips

    पुढील बातम्या