Home /News /lifestyle /

अंडी उकडल्यानंतर पाणी फेकून देता? फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत

अंडी उकडल्यानंतर पाणी फेकून देता? फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत

अंडी उकडल्यानंतर पाणी फेकून देता? फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत

अंडी उकडल्यानंतर पाणी फेकून देता? फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत

Benefits Of Boiled Egg Water: अंडी उकडल्यानंतर, ज्या पाण्यात ती उकडली आहेत ते पाणी आपण फेकून देतो. परंतु या पाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.

    मुंबई, 17 जून:  Benefits Of Boiled Egg Water: अंडी म्हणजे कित्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय...अंड्यापासून बनवलेल्या अनेक डिश आपण खातो. अंड्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपण आवडीने खातो. हे पदार्थ जेवढे स्वादिष्ट असतात, तेवढेच शरीरासाठीही लाभदायक असतात. म्हणूनच 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' असं म्हणतात. परंतु अंड्यांशी संबंधित एक गोष्ट अशी आहे, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. ज्याप्रमाणे उकडलेली अंडी शरीरासाठी फायदेशीर असतात, त्याचप्रमाणे ज्या पाण्यात ती उकडलेली आहेत, त्याचेही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया त्या फायद्यांबद्दल... वाचा: Weight Loss Tips: वजन कमी करताय? चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम 1. पोषक तत्वे अंड्याच्या टरफलांमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम विपुल प्रमाणात आढळते. त्याचप्रमाणे फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियमसुद्धा त्यामध्ये आढळते.   जेव्हा तुम्ही अंडे उकळता तेव्हा हे घटक पाण्यात मिसळतात. हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत. वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते. 2. खत ज्या पाण्यात अंडी उकडली आहेत ते पाणी किंवा अंड्याचे टरफल झाडांसाठी खत म्हणून काम करते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याची पुष्टी झाली आहे. मास्टर्स गार्डनर ऑफ हॅमिल्टनने हा अभ्यास प्रसिद्ध केला होता. या अभ्यासाच्या अहवालानुसार, तुम्ही ज्या पाण्यात अंडी उकळता. त्या पाण्यात अंड्यातील काही पोषक तत्त्वे उतरतात, जी झाडांसाठी खत म्हणून उपयोगी ठरतात. वाचा: Yuck! चिनी लोक चक्क लघवीत उकडतात अंडी; आवडीने खातात Virgin egg डिश 3. टोमॅटोच्या रोपांसाठी फायदेशीर- सूर्यप्रकाशाअभावी खराब होत असलेल्या झाडांसाठी उकडलेल्या अंड्यांचे पाणी खूप फायदेशीर ठरते. विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या पिकासाठी हे पाणी  उपयुक्त आहे.
    Published by:user_123
    First published:

    Tags: Food, Lifestyle

    पुढील बातम्या