मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; 'हे' 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; 'हे' 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; 'हे' 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; 'हे' 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

Diabetes Diet Plan: मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रुग्णांना मोठी कसरत करावी लागते. खाण्यापिण्यावर अनेक बंधने घालावी लागतात. परंतु तुम्ही जर मनापासून ठरवलं तर तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता.

मुंबई, 17 जून : मधुमेही (Diabetes) रुग्णांच्या संख्येत अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झालेली आहे. भारतात अनेक लोक या आजाराला बळी पडत आहेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रुग्णांना मोठी कसरत करावी लागते. खाण्यापिण्यावर (Diabetes Diet Plan) अनेक बंधने घालावी लागतात. परंतु तुम्ही जर मनापासून ठरवलं तर तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता. तसं पाहिलं तर हा आजार एकदा जडला की आयुष्यभर पाठ सोडत नाही, परंतु आपण योग्य ती काळजी घेऊन या आजाराला नियंत्रित ठेऊ शकतो आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून स्वत:ला दूर ठेऊ शकतो.

'येत्या काळात मधुमेहाचा धोका वाढेल'

WHO च्या मते, हा आजार येत्या काळात मृत्यूचे 7वे सर्वात मोठे कारण बनू शकतो. मधुमेह हा मेटाबॉलिक डिसीज ग्रुपचा आजार आहे. त्यावर नियंत्रण न ठेवल्यास किडनी निकामी होण्याची समस्या, लठ्ठपणा, कमी वेळात जास्त थकवा येणे, स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि मृत्यूला निमंत्रण मिळू शकते, त्यामुळे या आजारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुमेहावर आजार ठेवण्यासाठी आजपासूनच या 5 प्रकारच्या गोष्टी खाणे सुरू करा.

हेही वाचा: Hair Smoothening Treatment नंतर होतेय केस गळती? अशी घ्या केसांची काळजी

मधुमेहाच्या रुग्णांनी खावेत हे 5 पदार्थ (Diabetics should eat these 5 foods):

1. लिंबूवर्गीय फळांची साल (Citrus Fruit Peels):

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लिंबूवर्गीय फळांपासून मधुमेह तसेच रक्तदाब (Blood Pressure) सहज नियंत्रित केला जाऊ शकतो. लिंबू, संत्री, द्राक्षे यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या सालीमध्ये फ्लेव्होनॉइड्समुळे कडू किंवा तिखटपणा असतो. त्यात शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. त्याच्या मदतीने शरीरातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

2. कारल्याचा रस (Bitter Gourd Juice)-

कारल्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे, हे निःसंशय कडू आहे, परंतु आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये कॅरिटिन आणि मोमोर्डिसिन असते, जे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही सकाळी एक ग्लास कारल्याचा रस प्यायला तर लवकरच तुम्हाला दिसेल की तुम्ही तुमची साखर नियंत्रण करु शकता. कारण कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.

3. पालक (Spinach):

पालकमध्ये विपुल प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने आढळतात. अनेकजण डाळ शिजवताना त्यात पालक वापरतात. हे तुमच्यासाठी जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, कार्ब्स, प्रथिने यांचा समृद्ध स्रोत आहेत. पालकमध्ये कर्बोदके आणि कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी या हिरव्या पालेभाज्या खाण्याची शिफारस केली जाते. पालकामध्ये पॉलिफेनॉल आणि व्हिटॅमिन-सी असते, जे मधुमेह नियंत्रणात मदत करतात.

हेही वाचा: फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त खाणं टाळा; त्याचे हे साईड इफेक्ट होऊ लागतात

4. क्रूसिफेरस भाजी (Calciferous Vegetable):

क्रूसीफेरस भाज्यांमध्ये ब्रोकोली, पालक, गाजर, केळी, ब्रसेल स्प्राउट्स या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्या रक्तातील साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. या सर्व भाज्यांचे दररोज सेवन केल्याने एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांनी क्रूसिफेरस भाज्या खाणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्या आहारामध्ये या भाज्यांचा समावेश केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतील व आरोग्य सुधारेल.

5. क्रॅनबेरी रस (Cranberry Juice):

लाल रंगाच्या क्रॅनबेरी ही सामान्यतः उत्तर अमेरिकेत आढळणारं एक फळ आहे. क्रॅनबेरीमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात, ज्यामुळे मधुमेहाच्या वेळी स्ट्रोकपासून संरक्षण होते. नियमितपणे क्रॅनबेरीचे सेवन केल्याने तुम्ही हृदयही निरोगी ठेवू शकता.

First published:

Tags: Diabetes, Health, Health Tips, Tips for diabetes, Who