Home /News /lifestyle /

फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त खाणं टाळा; त्याचे हे साईड इफेक्ट होऊ लागतात

फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त खाणं टाळा; त्याचे हे साईड इफेक्ट होऊ लागतात

शरीरातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली, आतडे, रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी फायबर एक आवश्यक घटक आहे. परंतु, आवश्यकतेपेक्षा जास्त फायबर पोटात जाणं त्रासदायक ठरू शकतं, त्याविषयी जाणून घेऊया.

    नवी दिल्ली, 17 जून : आहारातून फायबर मिळणं उत्तम आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. फायबरच्या सेवनाने पचनक्रिया चांगली होते आणि आतड्याचे आरोग्य चांगले राहते. साधारणपणे फळे, भाज्या, धान्ये इत्यादी पदार्थांमधून शरीराला फायबरचा पुरवठा होतो. शरीरातील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली, आतडे, रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी फायबर एक आवश्यक घटक आहे. परंतु, जर आपण आवश्यकतेपेक्षा जास्त फायबरचे सेवन केले तर आपल्याला त्रास होऊ (Side Effects of Fiber) शकतो. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, पुरुषांना दररोज 38 ग्रॅम आणि महिलांना 25 ग्रॅम फायबरची गरज असते. पण जर तुम्ही या प्रमाणापेक्षा जास्त फायबरचे सेवन करत असाल तर तुम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. लक्षात घ्या की, फायबरचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, विद्रव्य फायबर आणि अघुलनशील फायबर. या दोन तंतूंची कार्ये वेगवेगळी आहेत आणि दोन्हीची पचनक्रिया वेगळी आहे. आज आपण फायबरच्या अतिवापरामुळे कोणते त्रास होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊया. जास्त फायबर खाण्याचे दुष्परिणाम - गॅसची समस्या - जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्यास गॅसची समस्या होऊ शकते. वास्तविक, जेव्हा पचनसंस्था फायबर पचवू शकत नाही, तेव्हा पोटात गॅस तयार होतो आणि समस्या निर्माण होते. अतिसार होईल - अन्न पचण्यात अडचण असल्यास अतिसाराचा त्रास होतो. फायबर युक्त आहार घेतल्यास अन्न जठरांत्रमार्गातून (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट) लवकर जाते आणि त्यामुळे अतिसाराची समस्या सुरू होऊ शकते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर बद्धकोष्ठता- जेव्हा आपण फायबर युक्त अन्न खातो तेव्हा भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास फायबर शरीरातील पाणी शोषण्याचे काम करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होऊ शकते. डिहायड्रेशन - फायबर विरघळण्यासाठी अधिक पाणी आवश्यक आहे. जेव्हा शरीरात फायबरचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते शरीरातील पाणी शोषून घेते आणि आपल्याला डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागतात. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा पोटदुखी - पचनसंस्थेत जाऊन फायबर लवकर पचत नसेल तर पोटदुखीचा त्रास सुरू होतो. अन्न पूर्णपणे पचत नाही तोपर्यंत त्रास होत राहतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या