मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /2 मुलांची आई.. PCOS चाही होता त्रास; तरी महिलेनं घटवलं तब्बल 30 किलो वजन, असा आहे सीक्रेट डाएट प्लॅन

2 मुलांची आई.. PCOS चाही होता त्रास; तरी महिलेनं घटवलं तब्बल 30 किलो वजन, असा आहे सीक्रेट डाएट प्लॅन

जेव्हा तिला पहिले मूल झाले तेव्हा तिचे वजन सुमारे 92 किलो झाले होते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अर्धवट माहितीवरून तिनं सुमारे 25 किलो वजन कमी केलं.

जेव्हा तिला पहिले मूल झाले तेव्हा तिचे वजन सुमारे 92 किलो झाले होते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अर्धवट माहितीवरून तिनं सुमारे 25 किलो वजन कमी केलं.

जेव्हा तिला पहिले मूल झाले तेव्हा तिचे वजन सुमारे 92 किलो झाले होते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अर्धवट माहितीवरून तिनं सुमारे 25 किलो वजन कमी केलं.

नवी दिल्ली, 09 मार्च : पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा स्त्रियांमध्ये होणारा हार्मोनल असंतुलन आजार आहे. अहवालानुसार, भारतातील 3.7 ते 22.5 टक्के महिलांमध्ये पीसीओएसचा प्रादुर्भाव आहे. तर काही अहवालांमध्ये असेही दिसून आलं आहे की, प्रत्येक 10 पैकी एका महिलेला PCOS आहे.

PCOS असलेल्या एका महिलेशी आज तकने चर्चा केली. या महिलेचा वजन कमी (Weight Loss ) करण्याचा प्रवास थक्क करणारा आहे, PCOS असतानाही महिलेनं आपलं वजन 30 किलोनं कमी केलं आहे. ज्या महिलांना वाटतं की पीसीओएसमुळे वजन कमी करता येत नाही, त्यांच्यासाठी ही उदाहरण ठरली आहे. या महिलेच्या फिटनेस प्रवासाविषयी जाणून घेऊया की, महिलेलं 30 किलो वजन नेमकं कसं (Weight Loss tips) कमी केलं.

92 ते 63 किलोपर्यंतचा फिटनेस प्रवास

स्वाती सोधी यांनी सांगितले आज तकला सांगितलं की, गर्भधारणेनंतर तिचं वजन वाढलं. जेव्हा तिला पहिले मूल झाले तेव्हा तिचे वजन सुमारे 92 किलो झाले होते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अर्धवट माहितीवरून तिनं सुमारे 25 किलो वजन कमी केलं. मात्र, दुसरे मूल झाल्यानंतर वजन पुन्हा वाढले.

वाढलेल्या वजनामुळे तिला दिवसभर काम करून, मुलांची काळजी घेणं त्रासदायक ठरत होतं. तिचा नवरा नौदलात आहे, त्यामुळे तिला दोन्ही मुलांची काळजी घ्यायची आणि एकल पालकाप्रमाणे त्यांच्यासोबत खेळायचं होतं. यानंतर तिनं पुन्हा पूर्वीप्रमाणेच वजन कमी करण्यास सुरुवात केली, तेव्हा कोणीतरी तिला सल्ला दिला की जर तुम्हाला फिटनेसची इतकी आवड आहे, तर मग तुम्ही व्यावसायिकपणे का करत नाही?

हे वाचा - या 5 सवयी तुमच्या आयुष्याला लावतील नवं वळण; वेळ निघून जाण्यापूर्वीच ध्यानात घ्या

मग काय, तिनं फेसबुकवर एक पेज पाहिलं आणि त्यावर पहिला आणि नंतर वजन कमी झाल्याचा फोटो पोस्ट केला. यानंतर, तिला जीम ट्रेनर म्हणून नोकरीची ऑफर देण्यात आली. त्यानंतर तिनं पोषक आहारा आणि वर्कआउट्सबद्दल सर्व मूलभूत ज्ञान घेतले. माहिती शिकत असताना लगेच तिनं तो डाएट फॉलो करत वजन 63 ते 65 किलो पर्यंत आणलं. कालांतराने तिचे मसल्स मास वाढले आहे.

हे वाचा - कोरोनानंतर Heart Rate वाढण्याचा त्रास हलक्यात नका घेऊ; वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

असा घेते आहार -

ब्रेकफास्ट (Breakfast)

ओट्स

अंडे

पनीर कटलेट

चिकन सँडविच

प्रोटीन शेक

स्नॅक्स (Snacks)

फळं

ड्राई फ्रूट्स

हे वाचा - Cucumber Peels Benefits: फक्त काकडीच नाही तर तिच्या सालीचेही आहेत अनेक फायदे

लंच (Lunch)

ग्रील चिकन किंवा मासे किंवा पनीर

रोटी किंवा भात

हिरव्या भाज्या

इविनिंग स्नॅक्स (Evening Snacks)

व्हे प्रोटीन शेक

डिनर (Dinner)

ग्रील चिकन

सलाद

सूप

First published:

Tags: Weight, Weight loss