मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Cucumber Peels Benefits: फक्त काकडीच नाही तर तिच्या सालीचेही आहेत अनेक फायदे

Cucumber Peels Benefits: फक्त काकडीच नाही तर तिच्या सालीचेही आहेत अनेक फायदे

अनेकांना काकडी सोलून खायला आवडते. तर काही लोक चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी काकडीची साल काढून गाभ्याचा वापर करतात. पण तज्ज्ञांच्या मते, काकडीची सालही खूप फायदेशीर आहे.

अनेकांना काकडी सोलून खायला आवडते. तर काही लोक चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी काकडीची साल काढून गाभ्याचा वापर करतात. पण तज्ज्ञांच्या मते, काकडीची सालही खूप फायदेशीर आहे.

अनेकांना काकडी सोलून खायला आवडते. तर काही लोक चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी काकडीची साल काढून गाभ्याचा वापर करतात. पण तज्ज्ञांच्या मते, काकडीची सालही खूप फायदेशीर आहे.

नवी दिल्ली, 07 मार्च : उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास अनेकांना होत असतो. तो टाळण्यासाठी विविध उपाय केले जात असतात. आहारातील (Diet) बदल हा यातील महत्त्वाचा भाग आहे. उन्हाळ्यात त्वचेची चमक (Skin Care) टिकवून ठेवण्यासाठी काकडीसारख्या काही थंडावा देणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर होतो. हेल्दी सॅलडपासून ते ग्लोइंग फेस पॅक बनवण्यासाठी उन्हाळ्यात काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, की फक्त काकडीचा (Cucumber) गाभाच नाही तर, काकडीची साल देखील आरोग्य आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर (Cucumber Peels Benefits) आहे.

अनेकांना काकडी सोलून खायला आवडते. तर काही लोक चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी काकडीची साल काढून गाभ्याचा वापर करतात. पण तज्ज्ञांच्या मते, काकडीची सालही खूप फायदेशीर आहे. काकडीच्या सालीमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सिलिकासारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. काकडीच्या सालीचा वापर केल्यानं त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात. चला जाणून घेऊया काकडीच्या सालीचे काही फायदे.

त्वचा चमकेल

उन्हाळ्यात अनेकदा त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. ऊन आणि धुळीमुळं त्वचा काळवंडणं, तेलकट होणं अशा समस्या निर्माण होतात. काकडीची साल चेहऱ्यावर लावून त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवू शकता. यामुळं त्वचेतील पाण्याची पातळी योग्य राखून ओलावाही कायम ठेवण्यात मदत होते. काकडीच्या सालीचा वापर केल्यामुळं त्वचेला उन्हाळ्यात थंडावा मिळतो.

हे वाचा - उरलेले साबणाचे तुकडे वापरून असा बनवा हँडवॉश; सॅनिटायझरवर फुकटचा खर्चच नको

काकडीच्या सालीची पावडर वापरा

काकडीची साले सुकवून त्यांची पावडरही बनवता येते. ही पावडर त्वचेसाठी खूप आरोग्यदायी आहे. या पावडरचा फेसपॅक लावल्यानं त्वचेवर टॅनिंग होणार नाही आणि त्वचेतील जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल.

हे वाचा - दिवसा झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या झोपेविषयी माहिती

पोट आकारात ठेवण्यासाठी

काकडी आणि तिच्या सालीत भरपूर फायबर असल्यामुळं काकडी सालीसहित खाणं केव्हाही चांगलं. यामुळं पचनक्रिया मजबूत होते. यामुळं पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची समस्या दूर होऊन पोटही स्वच्छ राहील. यामुळं निरोगी राहण्यास मदत होईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips