मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अंतर्वस्त्रावर मंगळसूत्र घातलेल्या मॉडेल्समुळे फॅशन डिझायनर सब्यसाची ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अंतर्वस्त्रावर मंगळसूत्र घातलेल्या मॉडेल्समुळे फॅशन डिझायनर सब्यसाची ट्रोलर्सच्या निशाण्यावर

प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी त्याच्या नवीन ज्वेलरी कलेक्शनच्या त्यातून मंगळसूत्राच्या जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. होमोसेक्शुअल मॉडेल्सही त्याने कलेक्शनमधून दाखवले आहेत.

प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी त्याच्या नवीन ज्वेलरी कलेक्शनच्या त्यातून मंगळसूत्राच्या जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. होमोसेक्शुअल मॉडेल्सही त्याने कलेक्शनमधून दाखवले आहेत.

प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी त्याच्या नवीन ज्वेलरी कलेक्शनच्या त्यातून मंगळसूत्राच्या जाहिरातीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. होमोसेक्शुअल मॉडेल्सही त्याने कलेक्शनमधून दाखवले आहेत.

मुंबई, 28 ऑक्टोबर: हिंदू संस्कृतीत (Hindu Culture mangal sutra ad) दिवाळी (Diwali) या सणाचे विशेष महत्त्व आहे. आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्यानं, सध्या देशात उत्साहाचे वातावरण आहे. खरेदी, सजावट, फराळ करणे आदीची गडबड उडाली आहे. कोरोनामुळे (Corona) असलेले कठोर निर्बंधही आता सैलावल्यामुळे लोक खरेदीचा आनंद लुटत असून, बाजारपेठा फुलल्या आहेत. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह वाहने, गृह खरेदी याचेही प्रमाण मोठे आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादक कंपन्या अनेक सवलती जाहीर करत आहेतच; पण त्याचबरोबर मोठ मोठ्या ब्रँडसच्या आकर्षक जाहिरातींचाही मारा सुरू आहे. अशाच एका जाहिरातीतील मॉडेल्सनं टिकली लावलेली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आणि सोशल मीडियावर अशा जाहिराती करणाऱ्या ब्रँडची उत्पादने खरेदी न करण्याबाबतच्या मोहिमेनं जोर धरला. हे ब्रँडस चांगलेच ट्रोल झाले. अखेर त्यांनाही या विरोधाची दखल घ्यावी लागली. आता प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) सब्यसाची मुखर्जीही (Sabyasachi) आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे ट्रोल (Troll) होत आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, फॅशन डिझायनर सब्यसाची बॉलिवूड सेलेब्रिटीपासून ते उच्चभ्रू, उच्च मध्यमवर्गीय ग्राहकवर्गामध्ये लोकप्रिय असून, त्याचे ड्रेसेस, ब्रायडल कलेक्शन विशेष पसंत केले जाते. बुधवारी त्याच्या नवीन ज्वेलरी कलेक्शनच्या जाहिरातीमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

टिकली वरून वादळ! जाहिरातीतल्या मॉडेल्सनी कुंकू न लावल्यावरून सोशल मीडिया तापला

सोशल मीडियावर या जाहिरातीबाबत तीव्र आक्षेप व्यक्त होत आहे. सब्यसाचीने इंटिमेट फाइन ज्वेलरी (Intimate Fine Jwellery) नावाने नवीन ज्वेलरी कलेक्शन दाखल केलं असून, यात वेगवेगळ्या डिझाइन्सच्या मंगळसूत्राचा (Magalsutra) समावेश आहे.

त्यातील द रॉयल बेंगॉल नामक (The Royal Bengal tiger icon collection) मंगळसूत्राच्या जाहिरातीचे काही फोटो सब्यसाचीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. यात फक्त अंतर्वस्त्र (Innerware) घातलेल्या काही हेट्रोसेक्श्युअल (HetroSexual) आणि होमो सेक्श्युअल (HomoSexul) मॉडेल्सच्या (Models) जोड्या आहेत.

हिंदू संस्कृतीतील विशेष संस्कार मानल्या गेलेल्या विवाह संस्कारात (Marriage) मंगळसूत्राचे अन्यन्नसाधारण महत्त्व आहे. मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार मानला जातो. तो केवळ एक दागिना नसतो तर त्याला भावनिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. विशेषत: महिलावर्गात (Women) मंगळसूत्राबाबत खास भावना असतात.

सौंदर्याच्या मोहात भयंकर अवस्था! 4 वर्षे अंथरूणाला खिळलाय जिवंत तरुणीचा 'मृतदेह'

या सगळ्या पार्श्वभूमीवर मंगळसूत्राची जाहिरात करण्यासाठी अशा प्रकारची कल्पना वापरण्यात आल्याबद्दल समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक युझर्सनी सब्यसाचीवर टीकेची झोड उठवली आहे. अशा जाहिरातीमुळे हिंदू धर्मियांच्या (Hindus) भावना दुखावल्या गेल्या असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. हा हिंदू संस्कृतीवर हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे. मंगळसूत्राचा मोठा ग्राहकवर्ग असलेल्या महिला वर्गाने तर त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.

अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न

एका महिला युझरने, कशी जाहिरात करत आहात? आता ही ज्वेलरी कोणीही घालणार नाही. ही ज्वेलरी घालायची असेल तर चीप व्हावं लागेल, असं चित्र यातून जगासमोर उभं राहत आहे. जाहिरात करताना काहीतरी भान बाळगा अशा शब्दांत सब्यासाचीला झापलं आहे. दुसऱ्या एका महिला युझरने ही अत्यंत लाजिरवाणी जाहिरात असल्याचं म्हटलं असून, कधीच त्याचे दागिने खरेदी करणार नसल्याचं म्हटलं आहे. तर अन्य एका महिला युझरने नेमके तुम्ही काय विकता आहात? मंगळसूत्र दाखवण्यासाठी अन्य कोणती पद्धत नव्हती? असं म्हटलं आहे. अशा प्रकारे हिंदू धर्मीयांच्या, महिलांच्या भावना दुखावणारी पोस्ट ताबडतोब काढून टाका अशी मागणीही युझर्सनी सब्यसाचीकडे केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदा सोशल मीडियावर धार्मिक, सांस्कृतिक मुद्द्यावरून शाब्दिक फटाके फुटत असून आता सब्यसाची याबाबत काय भूमिका घेतो त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Advertisement, Diwali 2021, Diwali Fashion, Fashion, India, LGBT