मुंबई, 23 ऑक्टोबर: सोशल मीडियावर एखादा hashtag ट्रेंड व्हायला लागतो, तेव्हा त्या मोहिमेच्या बाजूने आणि विरोधात भरपूर लिहिलं -बोललं जातं. सध्या #NobindiNoBusiness असा एक वेगळाच हॅशटॅग सुरू झाला आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि मराठी यूजर्समध्ये या हॅशटॅगची अधिक चर्चा आहे. एक प्रसिद्ध कपड्यांचा आणि दुसरा प्रसिद्ध ज्वेलरीचा ब्रँड (Models not wearing bindi) आणि त्यांच्या जाहिरातीतल्या मॉडेल्स (FabIndia ad controversy) यावरून हा विषय सुरू झाला. तो आता सेक्युलॅरिझम ते फेमिनिझमपर्यंत सगळ्या इझमना स्पर्श करत आहे.
हिंदू धर्माच्या प्रतिकांना मुद्दाम डावललं जातं, असं म्हणत काही जण या हॅशटॅगची पाठराखण करत आहेत, तर काही जण हा काय फालतूपणा आहे असं म्हणत विषयच निकालात काढत आहेत. स्त्रीने तिच्या कपाळावर कुंकू, टिकली लावावी की नाही हा तिचा प्रश्न आहे, धर्माचा नाही, असं सांगत सेक्युलॅरिझमचे धडे दिले जात आहेत, तर मुद्दामच दिवाळीच्या जाहिरातीत कथित 'भुंड्या' कपालांना दाखवर भावना दुखावण्याचा उद्देश आहे, असं दुसरी फळी म्हणते आहे.
FabIndia या कपड्यांच्या ब्रँडने दिवाळीनिमित्त जश्न ए रिवाझ (Jashn-e-Riwaaz) नावाचं कलेक्शन सादर केलं आहे. त्याच्या जाहिरातीतल्या मॉडेल्सनी कपाळावर कुंकू लावलेलं नाही.
Explainer: बांग्लादेशात अचानक हिंदूंंवर हल्ले कसे सुरू झाले? कोणाचा आहे कट?
यावरून एका ट्विटर यूजरने जाहीर निषेध नोंदवला आणि #NoBindiNobusiness ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. भाजपच्या तेजस्वी सूर्या यांनीही फॅबइंडियाचा निषेध केला आणि त्यानंतर सोशल मीडिया तापला. दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया सुरू झाल्या. शेफाली वैद्या या फेसबुक यूजरने NoBindiNoBusiness हा हॅशटॅग सुरू केला आणि यावरून उलट-सुलट कमेंट्सचा पाऊस सुरू झाला.
PNG अर्थात पु. ना. गाडगीळ यांच्या दागिन्यांच्या जाहिरातीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मॉडेल आहे. ती सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली आहे, पण कपाळावर कुंकू नाही, म्हणून या जाहिरातीला ट्रोल केलं जात आहे. शेफाली वैद्य यांनी या जाहिरातीबद्दलही लिहिलं.
कपाळ माझं, टिकली माझी -मी लावायची की नाही ते ठरवणार अशा अर्थाच्या लेखांनी फेसबुक वॉल आणि ट्िवटर हँडल्स भरून गेले, तर काही सोशल मीडिया आणि whatsapp युनिव्हर्सिटीच्या चेल्यांनी टिकली- कुंकू लावणं कसं आरोग्यदायी आहे असे लेखही लिहून फॉरवर्ड केले.
Proudly flaunting my Bindi#NoBindiNoBusiness#BindiTwitter pic.twitter.com/xcrBLG40co
— Adv Pragya Bhushan🌐 (@pragya_bhushan) October 21, 2021
दिवाळीच्या जाहिरातीत मॉडेल्सना हिंदू संस्कृतीप्रमाणे कुंकू का नाही लावलं, असा शेफाली वैद्य यांचा आक्षेप आहे. इतर वेळी कुणी काय लावायचं नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण जे ब्रँड्स दिवाळीसारख्या सणाची जाहिरात करताना संस्कृतीचं प्रतीक असणारी बिंदी विसरतात त्यांच्याकडून खरेदी करणार नाही, असी पोस्ट त्यांनी या #NoBindiNoBusiness हॅशटॅगसह लिहिली होती. त्यावरून वादंग सुरू झाला.
9 महिन्यांचा 100 कोटींपर्यंतचा प्रवास: भगीरथ प्रयत्न आणि लोकसहभागातून केलं अशक्य
यावरून अजूनही दररोज नवनवे Memes येत आहेत. कुंकू-टिकली लावणं न लावणं हा तसा वैयक्तिक प्रश्न पण यावरून सध्या जो सोशल गदारोळ सुरू आहे त्याला तोड नाही, हेच खरं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.