अंकारा, 27 ऑक्टोबर : आपण सुंदर दिसावं असं बहुतेक महिलांना वाटतं. सुंदर दिसण्यासाठी आता फक्त मेकअपच नाही तर प्लॅस्टिक, कॉस्मेटिक सर्जरीचाही (Cosmetic Surgery) पर्याय उपलब्ध झाला आहे. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात असलेली कमतरता कायमची दूर करता येते. नैसर्गिकरित्या नसलेले सौंदर्य कृत्रिमरित्या मिळवता येतं. पण अशा सौंदर्याचा मोह एका महिलेला भारी पडला आहे. जिवंतपणी ही तरुणी जणू मृतदेहच बनली आहे (Woman in Vegetative State after Cosmetic Surgery) .
तुर्कीतील अंताल्या प्रांतातील 32 वर्षांची सबीना अब्बास 4 वर्षांपासून रुग्णालयात आहे. तिचे डोळे, तोंड उघडेच राहिले आहेत. पण ना ती पाहू शकत, ना बोलू शकत, ना काही समजू शकत. ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये (Vegetative State) आहे.
व्हेजिटेटिव्ह स्टेट हे कोमासारखंच असतं. पण व्हेजिटेटिव्ह स्टेट आणि कोमात एक फरक आहे ते म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये व्यक्ती शुद्धीवर असते. पण त्याच्या आजूबाजूला काय होतं आहे हे त्याला समजत नसतं. त्या व्यक्तीचं शरीर म्हणजे एक जिवंत मृतदेहच असतं.
हे वाचा - सुंदर दिसण्यासाठी लावले फेक आयलॅश आणि महिलेचे डोळे...; भयंकर Photo पाहून हादराल
सबीनाला सुंदर दिसायचं होतं. त्यासाठी तिने आपली कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली. नाकाचा आकार बदलून घेतला आणि शरीरातील फॅट कमी करून घेतलं. एका प्रायव्हेट क्लिनिकमध्ये तिने 2017 साली तिने लाइपोसक्सशन आणि राइनोप्लास्टी एकत्र केली. लाइपोसक्शन अशी सर्जरी आहे, ज्यात शरीरातील कोणत्याही भागातील फॅट हटवला जातो आणि राइनोप्लास्टी ही नाकाची सर्जरी आहे, ज्यात नाकाला हवा तसा आकार दिला जातो. या सर्जरीवेळी चार मिनिटांसाठी तिचं हृदय बंद पडलं होतं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार सबीना ऑपरेशनदरम्यानच व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेली.
सबीना दोन मुलांची आई आहे. तिच्या अशा अवस्थेमुळे तिचा नवरा रुस्तम आणि मुलांचं आयुष्य कठीण झालं आहे. रुस्तम सांगतो, चार वर्षांपासून आमचं आयुष्य नरक झालं आहे. माझी सहा आणि चार वर्षांचं मूल आपल्या आईची घरी येण्याची प्रतीक्षा करत आहेत. रुग्णालय माझ्या बायकोला डिस्चार्ज देत आहे पण अशा अवस्थेत तिला घरी कसं नेऊ?
हे वाचा - बापरे! 14 वर्षांच्या मुलाने खाल्ले 16 टूथब्रश; वाईट सवय सोडवण्यासाठी भयंकर उपाय
रुस्तमने आपल्या बायकोच्या अशा अवस्थेला क्लिनकला जबाबदार ठरवलं आहे. त्यांनी क्लिनिकचे प्लॅस्टिक सर्जन आणि एनेस्थेसियोलॉजिस्टविरोधात तक्रार केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.