मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, विमानतळावर असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न

अंडरवियरमध्ये लपवली सोन्याची पेस्ट, विमानतळावर असा फसला ‘OLD STYLE’ तस्करीचा प्रयत्न

परदेशातील सोन्याची तस्करी (Custom officers seized 1kg smuggled gold kept in underwear) करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कस्टम विभागानं हाणून पाडला आहे.

परदेशातील सोन्याची तस्करी (Custom officers seized 1kg smuggled gold kept in underwear) करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कस्टम विभागानं हाणून पाडला आहे.

परदेशातील सोन्याची तस्करी (Custom officers seized 1kg smuggled gold kept in underwear) करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कस्टम विभागानं हाणून पाडला आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 26 ऑक्टोबर: परदेशातील सोन्याची तस्करी (Custom officers seized 1kg smuggled gold kept in underwear) करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कस्टम विभागानं हाणून पाडला आहे. आपल्या अंडरविअरमध्ये सोन्याची (Gold in liquid format) पेस्ट लपवून विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. कस्टम विभागानं मिळालेल्या टीपनुसार एका व्यक्तीची झडती घेतली (Gold in underwear and jeans) असता त्यांना त्याच्या अंडरविअर आणि जीन्समध्ये लाखो रुपयांचं सोनं आढळून आलं.

अशी पकडली चोरी

जयपूर विमानतळावरून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या व्यक्तीला कस्टम विभागानं ताब्यात घेतलं आहे. एअर अरेबियाच्या विमानानं ही व्यक्ती शारजाहून जयपूरला आली होती. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 60 लाख रुपयांचं सोनं जप्त केलं आहे.

अंडरविअरमध्ये सोन्याची पेस्ट

या तस्करानं सोनं वितळवून त्याची पेस्ट केली होती. ही पेस्ट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून ती पिशवी अंडरविअरच्या आत लपवली होती. त्याने जीन्सच्या आत एकावर एक दोन अंडरविअर घातल्या होत्या. स्कॅनिंगमध्ये चोरी पकडली जाऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली होती. मात्र कस्टम विभागानं ही चोरी पकडली आणि तस्कराला ताब्यात घेतलं. अंडरविअरशिवाय जीन्समध्येही त्यानं सोनं लपवलं होतं. कंबरपट्टा म्हणून घातलेल्या दागिन्यातही सोनं लपवण्यात आलं होतं.

जुन्या स्टाईलची तस्करी

तस्कर हे नेहमीच तस्करीचे नवनवे मार्ग शोधून काढत असतात. मात्र कस्टम विभागाचे अधिकारी दरवेळी त्यांचा पर्दाफाश करत असतात. मात्र जीन्समध्ये सोन्याची पेस्ट लपवणे, अंडरविअरमध्ये पावडर लपवणे वगैरे तस्करीचे जुनेच प्रकार असल्याचं कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच पद्धतीनं तस्करीच्या प्रयत्नात असणाऱ्याला अटक करून पोलिसांनी चौकश सुरू केली आहे.

हे वाचा- विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, नवऱ्यानेच हत्या केल्याचा आईचा आरोप

यापूर्वीही झाला होता तस्करीचा प्रयत्न

जयपूर विमानतळावर काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे सोन्याची तस्करी पकडण्यात आली होती. तो तस्करदेखील एअर अरेबियाच्या विमानानंच भारतात आला होता आणि लिक्विड सोनं त्यानं आपल्या अंडरविअरमध्ये लपवलं होतं. त्या सोन्याची किंमत होती सुमारे 73 लाख रुपये. त्यानंतर पुन्हा तस्करीचा प्रयत्न पकडण्यात आला आहे. ही तस्करी कुठून आणि कुणाच्या आदेशावरून होत होती, याचा पोलीस शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime, Gold, Rajsthan, Smuggling