• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • अरे देवा! कोरोनानंतर आता Monkeypox; किती खतरनाक आहे हा व्हायरस पाहा

अरे देवा! कोरोनानंतर आता Monkeypox; किती खतरनाक आहे हा व्हायरस पाहा

मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण सापडल्याने आता खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  ब्रिटन, 11 जून: एकिकडे संपूर्ण जग कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) दोन हात करतं आहे. त्यात आता आणखी एका व्हायरने एंट्री घेतली आहे. त्यामुळे आता चिंता अधिक वाढली आहे. कोरोनाव्हायरसप्रमाणे आता मंकीपॉक्सची प्रकरणं समोर आली आहेत. यूकेमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण (Monkeypox) सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेल्समध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले दोन रुग्ण सापडले आहेत. हे दोघंही एकाच घरात राहत होते, अशी माहिती वेल्सच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या दोघांनाही परदेशात मंकीपॉक्सची लागण झाली होती, असंही आरोग्य विभागाने सांगितलं. या रुग्णांना इंग्लंडच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आलं. एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत. इंग्लंडमधील आरोग्य विभागही यावर लक्ष ठेवून आहे. हे वाचा - जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाचं वजन माहिती आहे का? वाचून बसेल आश्चर्याचा धक्का वेल्सचे सार्वजनिक आरोग्य सल्लागार रिचर्ड फर्थ यांनी सांगितलं की, ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं सापडणं हे दुर्मिळ आहे. ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही शोधण्यात आलं आहे आणि संक्रमण पसरू नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तसा या व्हायरसचा धोका खूप कमी आहे. काय आहे मंकीपॉक्स व्हायरस? मंकीपॉक्स हा जुना व्हायरस आहे. हा व्हायरस आफ्रिकन देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. उष्णकटिबंध परिसरात, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशातील दुर्गम भागात हा व्हायरस पसरतो. त्यामुळेच या व्हायरसचे पश्चिम आफ्रिकी आणि मध्य आफ्रिकी असे दोन मुख्य प्रकार आहेत काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणं? सुरुवातीला ताप, सूज डोकेदुखी, कमरेत वेदना, स्नायूंमध्ये वेदना चिकनपॉक्ससारखेच त्वचेवर पुरळ येणं ताप आल्यानंतर असे पुरळ येऊ लागतात. चेहऱ्यावर पुरळ येतात मग ते शरीरावर पसरतात सामान्यपणे हात, हाताचे पंजे आणि पायांच्या तळव्यांवर पुरळ येता. हा व्हायरस 14 ते 21 दिवस शरीरात राहू शकतो. हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर भारतात आणखी एक जीवघेणा व्हायरस! इथं सापडला पहिला रुग्ण मंकीपॉक्स व्हायरस हा स्मॉलपॉक्स व्हायरससारखाच असतो. तज्ज्ञांच्या मते,  हा आजार तसा घातक नाही आणि त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही तशी कमी आहे. मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणं सौम्य असतात. काही आठवड्यांतच हा आजार बरा होतो. पण कधी कधी हा आजार गंभीरही होऊ शकतो. पश्चिम आफ्रिकेत या आजारामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: