मुंबई, 31 मे : World No Tobacco Day 2022: जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे आणि दरवर्षी सुमारे दहा लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मरत आहेत. त्याचवेळी, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशननुसार, भारतात दररोज 14 वर्षांखालील 6000 मुले तंबाखूच्या व्यसनाला बळी पडत आहेत. एवढेच नाही तर 15 वर्षांवरील भारतीय लोकसंख्येपैकी 40 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारची तंबाखू वापरतात. तंबाखूमध्ये 4000 हून अधिक प्रकारची रसायने आहेत, ज्यामध्ये 70 हून अधिक कार्सिनोजेन्स आणि निकोटीन आढळतात, ज्याचं दीर्घकाळ सेवन केल्याने व्यक्ती व्यसनाधीन बनतो. परिणामी गंभीर आजार होण्याची शक्यता बळावते. मॅक्स हॉस्पिटल गुरुग्राम येथील ईएनटी विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ. रविंदर गेरा यांच्या म्हणण्यानुसार, तंबाखूचे सेवन कोणत्याही स्वरूपात आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र, ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही बदलत्या परिस्थितीमुळे अधिकाधिक तरुण या सवयींच्या आहारी जात आहेत. तंबाखूच्या वापरामुळे जीवघेणे आजार होत असल्याने तंबाखूचे कोणतेही सेवन न करण्याबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन सोडल्यास तोंडाचा कर्करोग बऱ्याच प्रमाणात टाळता येतो. जागतिक तंबाखू विरोधी दिन आपल्याला तंबाखूच्या वापरामुळे शरीर आणि पर्यावरण या दोघांना होणाऱ्या धोक्यांबद्दल लोकांना जागरूक करण्याची संधी देतो. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन; स्वत:च्या हाताने मृत्यू ओढावतायत 80 लाख लोक तंबाखूच्या संसर्गाची सुरुवात तोंड आणि घशातून होते डॉ. रविंदर गेरा यांच्या मते, धुम्रपानाचे दुष्परिणाम कफ आणि घशातील संसर्गासोबतच श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे त्वचेवर डागही पडतात आणि दातांचा रंग खराब होतो. कालांतराने, हृदयरोग, ब्राँकायटिस, न्यूमोनिया, स्ट्रोक आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग यांसारख्या गंभीर समस्या वाढतात, ज्यापैकी तोंडाचा कर्करोग हा सर्वात सामान्य आहे. तंबाखूचे सेवन हे जीवघेण्या आजारांचे खरे कारण असल्याने तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषज्ञ योग्य तपासणीद्वारे शरीरात धूम्रपानाशी संबंधित कोणतेही बदल ओळखू शकतात आणि ही समस्या वाढण्यापासून रोखू शकतात. धूरविरहित तंबाखूचा वापर अधिक धोकादायक मॅक्स हॉस्पिटल गुरुग्राम येथील वैद्यकीय ऑन्कोलॉजीचे सल्लागार डॉ. भुवन चुघ म्हणतात की धूम्रपान घातक आहे. यामुळे मृत्यू देखील होतो आणि भारतातच वर्षभरात 12 लाख मृत्यू होतात. याशिवाय, तोंडाच्या कर्करोगाच्या 90 टक्के प्रकरणांसाठी धूररहित तंबाखूचा वापर कारणीभूत असल्याचे मानले जाते. त्यामुळे जवळपास सर्वच अवयवांवर परिणाम होऊन अनेक आजार उद्भवतात. तंबाखू सेवन आणि धुम्रपानामुळे होणार्या आजारांची व्याप्ती तर प्रचंड आहेच, शिवाय ते खर्चिकही आहे. यामध्ये ब्रेन स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसऑर्डर, तोंडाचा कर्करोग, घसा, स्वरयंत्र, फुफ्फुस, स्वादुपिंड, मूत्राशय याशिवाय स्वादुपिंड, मूत्रपिंड, यकृत आणि पोटाशी संबंधित आजारांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.