दिल्ली, 22 सप्टेंबर : कोरोना महामारीमुळे (Coronavirus) जगभरातील लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या महामारीमुळे भारतासह अनेक (Coronavirus in india) देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे आता ज्या जगभरातील विविध कंपन्या कोरोना लसीचं उत्पादन करत आहे आणि ज्या पद्धतीने सार्वत्रिक लसीकरण सुरू आहे, हे बघता आता लोकांसाठी लसीमुळे (corona Vaccine for cancer) आशेचा किरण निर्माण होत आहे. त्यामुळे भारतातही लोकांचे विक्रमी लसीकरण होत आहे. त्यामुळे आता लोकांना लस घेताना कोणती घ्यावी, कोणता लस ही आपल्यासाठी फायदेशीर आहे, याची चिंता आहे. त्यामुळे आता लोकांना आपले दोन्ही डोस पूर्ण करताना लसीची निवडही महत्त्वाची वाटत आहे. कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या काही लसी आता कॅन्सरच्या आजारावरही (Covid vaccine effective in cancer patient) प्रभावी ठरत असल्याने आता आपल्यासाठी ही फार आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता कॅन्सरग्रस्त लोकांना दिलासा मिळणार आहे. आपके हसीं पैर… पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका वैज्ञानिकांनी केलेल्या एका दाव्यानूसार कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कोविशिल्ड, मॉडर्ना आणि फायजर या कोरोना लसी प्रभावी ठरणार आहे, त्याचे काहीही साईड इफेक्टही नाही आहेत. त्यामुळे आता कॅन्सरपिडीतांना दिलासा मिळाला आहे. मिंट ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार वैज्ञानिकांनी यूरोपियन सोसाइटी अॉफ मेडिकल ऑन्कोलॉजी (European Society for Medical Oncology) समोर आपली याबाबत काही निरिक्षणं नोंदवली आहेत. त्यात कोरोना लस हा कोणत्याही धोक्याशिवाय कॅन्सर पिडीतांना उपयोगी ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. कारण जेव्हा कोरोनासाठी या लसी आणल्या जात होत्या त्यावेळी अनेकांनी त्याच्या परिणामकारतेवर शंका उपस्थित केल्या होत्या. Makeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता? त्वचेवर होतील हे गंभीर आता या सर्वेक्षणातून कोरोना लस ही कॅन्सर साठीही परिणामकारक ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. संशोधकांनी या संशोधनासाठी नेदरलंडमधील विविध रुग्णालयातील 792 कॅन्सर पिडीत रूग्णांवर कोरोना लसीचे संशोधन केले होते. त्यात त्यांना काही सकारात्मक परिणाम जाणवले. त्यामुळे आता कोरोनाच्या सर्व लसी या कॅन्सरवरही तारक ठरणार आहे. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.