मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

नपुंसकत्वाच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको; वेऴीच वैद्यकीय सल्ला ठरेल फायदेशीर

नपुंसकत्वाच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको; वेऴीच वैद्यकीय सल्ला ठरेल फायदेशीर

 जर एक वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि तुम्ही गर्भवती होऊ शकत नसाल, तर हे वंध्यत्वाचे लक्षण असू शकते. या लेखामध्ये आपण काही टिप्स जाणून घेऊ.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : आजकालच्या धावपळीच्या युगात वंध्यत्वाची किंवा वांझपणाची समस्या महिला आणि पुरुष दोघांमध्ये सामान्य झाली आहे. जर एक वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहात आणि तुम्ही गर्भवती होऊ शकत नसाल, तर हे वंध्यत्वाचे लक्षण असू शकते. या लेखामध्ये आपण काही टिप्स जाणून घेऊ. ज्याच्या मदतीने तुम्हाला वंध्यत्वाची समस्या आहे की नाही हे समजू शकेल, जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर वेळेवर उपाय करणं गरजेचं आहे. लवकर गर्भधारणा होण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊ शकता.

आपण याबाबीकडे वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. वंध्यत्वाची समस्या वेळीच लक्षात आल्यास त्यामुळे जीवनशैलीतील बदल आणि उपचारांद्वारे त्यावर मात करता येईल.

मासिक पाळीमध्ये अनियमितता -

अनियमित पाळी म्हणजे पाळी लवकर होणे, पाळी चुकणे किंवा पाळीचा कालावधी आठ दिवसांपेक्षा जास्त काळ राहणे. जर ही समस्या असेल तर 30-40 टक्के प्रकरणांमध्ये हे वंध्यत्वाचे लक्षण असू शकते. मासिक पाळीतील अनियमितता देखील अंडकोशांच्या उत्पादनावर परिणाम करू शकते. ज्याला एनोव्हुलेशन म्हणतात. एनोव्हुलेशनचा उपचार औषधांद्वारे केला जाऊ शकतो. त्यावर उपचार करता येतात. फक्त लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

हे वाचा - काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मोठा धक्का; अमरिंदर पोहोचले अमित शाहांच्या घरी

मासिक पाळीच्या रंगात बदल

मासिक पाळीवेळी पाळीच्या रंगामध्ये बदल होणे हा एक इशारा देखील असू शकतो. मासिक पाळीचे रक्त लाल, गुलाबी आणि तपकिरी रंगाचे असणे सामान्य आहे. कधीकधी रंगात बदल प्रोजेस्टेरॉन हार्मोनची कमतरता आणि एंडोमेट्रिओसिसमुळे देखील दर्शवू शकते. म्हणून जेव्हाही शंका असेल तेव्हा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा - निर्दय! बापाने पोटच्या लेकीला आपटून आपटून केलं ठार, आईवडिलांच्या भांडणात लेकीचा बळी

सेक्स दरम्यान वेदना

सेक्स करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे ओटीपोटाची समस्या किंवा एंडोमेट्रिओसिसचे कारण असू शकते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips