कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

कोरोनावर मात करण्यासाठी तुमच्याकडेही आहे लस, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

या जीवघेण्या महामारीवर मात करण्यासाठी जगातील सर्व देश लस शोधण्यात गुंतले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या जीवघेण्या महामारीवर मात करण्यासाठी जगातील सर्व देश लस शोधण्यात गुंतले आहेत. पण अशात कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाय आणि पद्धती समोर आल्याचं आपण पाहिलं असेल. कोरोना झाल्यावर त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जातात, पण मुळात कोरोना न होण्यासाठी आपलं आरोग्य उत्तम असणं महत्त्वाचं आहे आणि हीच खरी कोरोनाची लस आहे असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.

आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि कठोर परिश्रम करण्याची सवय असल्यामुळे कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतरही बरे होण्याची शक्यता वाढते. सुरक्षा दलांमध्ये संक्रमित सैनिकांचा बरे होण्याचा दर सामान्य सरासरीपेक्षा जास्त आहे, कारण ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट आहेत असं मत तज्ञांनी मांडलं आहे.

भारतासाठी सर्वात धोकादायक ठरले 24 तास, तब्बल 6977 नवीन रुग्णांची नोंद

राष्ट्रीय पातळीवर, कोव्हिड-19 संसर्गाचं प्रमाण सुमारे 40 टक्के आहे. काही राज्यांमध्ये 47 टक्‍क्‍यांपर्यंत प्रमाण आहे, परंतु सुरक्षा दलात संक्रमित कोरोनाचा बरं होण्याचा दर सुमारे 70 टक्के आहे. सीमा सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांच्या बरं होण्याचा दर 72.2 टक्के आहे. बीएसएफचे प्रवक्ते शुभेंदू भारद्वाज म्हणाले की, इच्छाशक्ती मजबूत असल्यास या आजारावर मात करता येईल. कर्करोगाच्या दोन रुग्णांना आणि मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या तीन रुग्णांना (ज्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस घ्यावं लागलं) कोरोना व्हायरसने घेरलं होतं आणि या साथीच्या आजारावर मात करून ते बरे झाले आहेत. एकूण 410 रुग्णांपैकी 296 रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचा लसीचा 108 रुग्णांवर प्रयोग झाला यशस्वी, वाचा काय आले रिपोर्ट

आयटीबीपीमध्येही संक्रमित सैनिकांच्या रिकव्हरीचे प्रमाण सुमारे 65 टक्के आहे. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे म्हणाले की, त्यांच्या सुरक्षा दलातील कोणत्याही जवानांना संसर्गाशी संबंधित गंभीर अवस्था दिसली नाही. आतापर्यंत 189 जवानांपैकी 121 जवान बरे झाले आहेत. ज्या प्रकारे रुग्ण बरे होत गेले, अशी अपेक्षा आहे की जवळपास सर्व सैनिक संक्रमणामधून बाहेर येतील. सीआरपीएफमध्ये दोन सैनिकांचा मृत्यू झाला, पण आता बहुतेक सैनिक तिथेही संसर्गातून बाहेर येत आहेत.

त्यामुळे कोरोनावर योग्य ती लस आवश्यक तर आहेच पण त्याआधी तुमचं आरोग्य ठीक असणं, योग्य आहार असणं, शरीराला व्यायामाची सवय असणं, गरम पाणी पिणं, आहारात पालेभाज्या कडधान्ये असणं अशा अनेक सवयी तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारालाही वाचवणं शक्य होतं.

सगळ्यांसाठी दिलासादायक बातमी, देशातल्या सर्वात लहान रुग्णाने केली कोरोनावर मात

संपादन - रेणुका धायबर

First published: May 25, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading