बीजिंग, 10 मार्च : मेट्रो, एसी बस, एसी ट्रेन किंवा इतर एसी गाड्यांमधून (Air conditioned) तुम्ही प्रवास करताय तर सावध व्हा. कारण अशी एसी गाड्यांमधून प्रवास केल्याने तुम्हाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ शकतो. संशोधनामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
COVID-19 हा विषाणू कोणत्या माध्यमातून पसरू शकतो, याबाबत नुकतंच संशोधन झालं आहे. या संशोधनानुसार एअर कंडीशनर बस, मेट्रो आणि इतर गाड्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास इतर प्रवाशांनाही या व्हायरसची लागण होऊ शकते. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
संबंधित - जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. वातानुकूलित ठिकाणी हवेमार्फत कोरोना व्हायरस पसरू शकते. अशा ठिकाणी कोरोनाव्हायरस 30 मिनिटं जिवंत राहू शकतो. शिवाय 4.5 मीटर पोहोचण्यास सक्षम असतो, असं संशोधकांनी म्हटलं
ग्लोबल टाइम्समध्ये देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, चीनच्या हुनान प्रांतात कोरोनाशी संपर्कात आलेल्या 15 पेक्षा जास्त लोकांवर अभ्यास करण्यात आला. हे सर्व एसी बसने प्रवास करत होते. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका कोरोनाव्हारस रुग्णामुळे मास्क न घातलेल्या सर्वांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. याच व्यक्तीने आणि आणखी एका बसने प्रवास केला आणि तिथंही मास्क न घातलेल्या दोघांना कोरोनाव्हायरस झाला.
संबंधित - सावधान ! तुम्ही वापरत असलेल्या नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’
आश्चर्य म्हणजे या बसमधील कोरोनाव्हायरस रुग्ण उतरल्यानंतर 20 आणि 30 मिनिटांनंतर काही लोकं चढली होती, मात्र एसीमुळे कोरोनाव्हायरस नष्ट झाला नव्हता. याचा अर्थ वातानुकूलित ठिकाणी कोरोनाव्हायरस 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ जिवंत राह शकतो. कोरोनाग्रस्त व्यक्तीपासून 4.5 मीटर दूर बसलेल्या लोकांनाही या व्हायरसची ललागण झाली. मात्र ज्यांनी मास्क घातला नव्हता अशाच लोकांना याची लागण झाली होती.
शास्त्रज्ञांच्या मते, बंद ठिकाणी जसं की वातानुकूलित खोली, बस, मेट्रोमध्ये व्हायरस अपेक्षेपेक्षा जास्त घातक स्तरावर पसरतो आहे. त्यामुळे तुम्ही अशा सार्वजनिक एअर कंडीशनर गाड्यांमधून प्रवास करत असाल तर सावध राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus india