पुणे, 10 मार्च : देशातल्या इतर राज्यांनंतर आता महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाव्हायरस (Coronavirus) पोहोचला आहे. पुणे (Pune) शहरात कोरोनाव्हायरसचे 2 रुग्ण सापडलेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून (Dubai) महाराष्ट्रात परतलेत.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पुण्यातील दोन्ही व्यक्तींचे कोरोनाव्हायरस रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
Two people from Pune test positive for novel coronavirus infection: Health official
— Press Trust of India (@PTI_News) March 9, 2020
या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. मूळ शहरात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकामध्ये कोरोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही.
होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे.
संबंधित - मेट्रो, एसी बसमधून प्रवास करताय सावधान ! तुम्हाला होऊ शकतो 'कोरोना'
भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढला आहे. सोमवारीदेखील कर्नाटक (Karnataka) आणि पंजाबमध्ये (Punjab) कोरोनाव्हायरसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरूत (Bengaluru) एका आयटी इंजिनीअरला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातील हा पहिला रुग्ण आहे. जो यूएसमधून भारतात आला. तर पंजाबमधील रुग्ण इटलीहून भारतात परतला. याआधी केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाव्हायरसचे रुग्ण आढळून आलेत. केरळमधील सुरुवातीच्या 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
संबंधित - जगातील सर्वात हेल्दी देशही 'कोरोना'च्या विळख्यात, व्हायरसमुळे झाले बेजार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus, Pune news