नवी दिल्ली, 12 मे : भारतात (India) कोरोनाव्हायरसचे (coronavirus) एकूण 70,756 रुग्ण आहेत. तर 2,293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिवसागणिक वाढत जाणारी रुग्णांच्या आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल. सुरुवातीला कोरोनाचे नवे 10000 रुग्ण यायला 75 दिवस लागायचे मात्र आता फक्त 2 दिवसांत 10000 रुग्ण आढळून आलेत. या आकडेवारीवरून देशात कोरोनाव्हायरस किती झपाट्यानं पसरतो आहे, याची कल्पना आलीच असेल.
30 जानेवारी ते 14 एप्रिलदरम्यान 10 हजार कोरोना प्रकरणं होती. त्यानंतर 10 हजार प्रकरणं येण्यात दिवस लागले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 15 एप्रिल ते 22 एप्रिलदर्यान कोरोना रुग्णांच्या संख्या 20 हजारांवर पोहोचली आणि यानंतर तर कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येचा ग्राफ झपाट्यानं वाढू लागला.
हे वाचा - PM आज 8 वाजता करणार जनतेला संबोधित, लॉकडाऊन वाढवण्याबाबत घोषणा करण्याची शक्यता
कोरोना संक्रमित रुग्णांचा 30 हजारांचा आकडा पार करायला 7 दिवसांचा कालावधी लागला. 23 एप्रिल ते 29 एप्रिलदरम्यान 10 हजार नवी प्रकरणं समोर आली. त्यानंतर 4 दिवसांतच कोरोना रुग्णांचा आकडा चाळीशी पार गेला. 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 40 हजारच्या जवळपास पोहोचली.
कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचण्यास 3 दिवस लागले. 4 ते 7 मेदरम्यान 10 हजार आणखी नवे रुग्ण सापडले. तर 8 मे ते 10 मेदरम्यान एकूण रुग्ण 60 हजारांच्या वर गेले. गेल्या 2 दिवसांत तर कोरोनानं जणू धक्कादायक रूपच घेतलं. 2 दिवसांतच 10 हजार नवे रुग्ण आढळले आणि देशातील रुग्णांची संख्या 70 हजारांपेक्षा जास्त झाली.
अशा स्थितीतही भारताला दिलासा
शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी लोकांचा मृत्यू झाला. शनिवारी आणि रविवारी कोरोनामुळं 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र सोमवारी हा आकडा कमी झाला. सोमवारी 82 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राती परिस्थितीही सुधारताना दिसत आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी प्रकरणं समोर आली. रविवारी 1276 नवीन प्रकरणं आढळून आली होती तर, सोमवारी हा आकडा 1276 होता. गेल्या 6 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे.
हे वाचा - 70 हजारांचा टप्पा पार करूनही भारतासाठी दिलासादायक बातमी
संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.