Home /News /lifestyle /

तुमची फक्त 'ही' एक सवय आजारांपासून वाचवेल, 50 टक्के इन्फेक्शनचा धोका टाळेल

तुमची फक्त 'ही' एक सवय आजारांपासून वाचवेल, 50 टक्के इन्फेक्शनचा धोका टाळेल

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

प्रामुख्याने कोरोना व्हायरस हा हाताला लागून तो शरीरात घुसतो असं संशोधनातू दिसून आलं होतं. त्यामुळे वारंवार हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

इन्फेक्शन (Infcetion) रोखण्यात स्वच्छतेची सवय (hygine practice) परिणामकारक असल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे.

    ब्रिटन, 12 मे : कोरोनाव्हायरससारख्या (coronavirus) महाभयंकर आजारापासून बचाव करण्यात सध्या फक्त हात धुणं (hand washing) ही सोपी सवयच महत्त्वाची ठरत आहे. हात धुण्याप्रमाणेच स्वच्छतेच्या इतर सवयीही कित्येक सामान्य इन्फेक्शनपासून वाचवतात. नियमित स्वच्छतेच्या सवयींच्या अवलंब केल्यास इन्फेक्शनचा धोका 50 टक्के कमी होतो. शिवाय अशा इन्फेक्शनवर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अँटिबायोटिक्स औषधांची गरजही 30 टक्के कमी होते. ब्रिटनच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलमध्ये  (American Journal of Infection Control) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वाचा - व्हायरसची लस यायला लागणार 6 महिने; पुण्याच्या तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला नियमित स्वच्छता अँटिबायोटिक्स औषधं कमी घेण्यात आणि अँटिबायोटिक्स रेजिस्टनचा धोका कमी करण्यात काय भूमिका बजावतं हे समजून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यानुसार घरातील आणि सार्वजनिक ठिकाणी हातांच्या स्वच्छतेप्रमाणे इतर स्वच्छतेच्या सवयीही बाळगल्यास इन्फेक्शन रोखता येऊ शकतं. तसंच अँटिबायोटिक्स औषधांची गरजही फारशी पडणार नाही. ब्रिटनच्या कार्डिफ युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ जीन यवेस मिलॉर्ड यांनी सांगितलं, सध्या कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत आणि आमच्या अभ्यासानुसार मिळालेले पुरावे सांगत आहेत की, इन्फेक्शनचा प्रसार कमी करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यामुळे अँटिबायोटिक्सची गरज कमी होईल आणि आजारांविरोधात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यात मदत होईल" हे वाचा - Coronavirus चा धोका : स्वच्छतेसह असा सुरक्षित आहार घ्या, WHO चा सल्ला संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या