जगभरात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चीनच्या वुहान शहरातून पसरला. 100 पेक्षा अधिक देशांमध्ये या व्हायरसचे रुग्ण आहेत. 31 जानेवारी 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याला ग्लोबल एमर्जन्सी घोषित केलं.
इबोला – पश्चिम आफ्रिकेतल्या गुयानामध्ये 2014 साली इबोला व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर २०१९ साली डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोतून हा व्हायरस परसला. अद्यापही यावर औषध शोधलं जातं आहे.
17 जुलै, 2018 ला झिका व्हायरसमुळे जगभरात मेडिकल एमर्जन्सी लागू झाली होती. हा व्हायरस ब्राजीलमधून पसरला होता. अजूनही या व्हायरसवर औषध बनलेलं नाही.
जगातील कित्येक देशांमध्ये पोलिओ आहे. जेव्हा जगाच्या मध्य पूर्व भागात हा आजार पसरला तेव्हा 2014 साली हेल्थ एमर्जन्सी जारी करण्यात आली होती. आता यावर लस आहे.यावर लस उपलब्ध आहे.
एप्रिल 2009 मध्ये H1N1 म्हणजे स्वाइन फ्लूमुळेही हेल्थ एमर्जन्सी लागू झाली होती. मेक्सिकोतून पसरलेल्या या व्हायरसवर आता उपचार उपलब्ध आहे. तरीदेखील बहुतेक देशांमध्ये याचा परिणाम कायम आहे.