मुंबई, 26 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) साथीमुळे हवालदिल झालेलं संपूर्ण जग आता सकारात्मक बातमीकडे डोळे लावून बसलं आहे. कोव्हिड 19 (covid 19) वरील अमेरिकेतील दोन आणि ब्रिटनमधील एक अशा तीन कोरोना लशींच्या (corona vaccine) तिसऱ्या टप्प्यातील सुरुवातीचे निकाल सकारात्मक आले आहेत. अंतरिम चाचण्यांचे हे निकाल किती महत्त्वपूर्ण आहेत. असे निकाल हाती लागणं म्हणजे लस यशस्वी ठरण्याचे संकेत आहेत का? असे बरेच प्रश्न निर्माण होत आहेत.
एका आठवडाभरात कोविड 19 वर प्रभावी ठरलेल्या तीन लशींची बातमी मिळाली. यापैकी दोन लशी अमेरिकेतील फायझर-बायोएनटेक आणि मॉडर्ना कंपनीची तर एक लस ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी-अॅस्ट्राझेन्का आणि भारतातील सीरम इन्स्टिट्युटनं मिळून तयार केली आहे.
फायझर कंपनीने बुधवारी त्यांची एमआरएनए आधारित लस ‘BNT162b2 तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनंतर 95 टक्के प्रभावी असल्याचं जारी केलं. कोविड 19 ची लागण झालेले आणि न झालेल्या लोकांवर या चाचण्या करण्यात आल्या. लस दिलेल्या एकामध्येच तर प्लेसबो दिलेल्या 9 जणांमध्ये गंभीर प्रकरणं दिसून आल्याचं कंपनीनं सांगितलं.
अमेरिकन सरकारने निधी पुरवलेल्या मॉडर्ना कंपनीने आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये निश्चित करण्यात आलेल्या गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण केले असून ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचं जाहीर केलं आहे. 95 रुग्णांवर या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 90 जण हे प्लेसबो मिळालेले होते तर पाच जणांना ही लस देण्यात आली होती.
सोमवारी ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेन्का यांनी आपली लस 90 टक्के गुणकारी ठरल्याचा दावा केला. त्यांनी 2 हजार 471 लोकांना एक डोस दिला होता. पहिला डोस दिल्यानंतर एका महिन्यानंतर दुसरा डोस देण्यात आला होता. त्यांच्यामध्ये 62 टक्के प्रभाव दिसून आला. सरासरी प्रभाव 70 टक्के आहे.
क्लिनिकल गुणवत्तेचा अर्थ काय आणि अंतरिम चाचण्यांचे निकाल दिलासादायक आहेत का?
कोविड 19 वरील प्रत्येक लशीच्या तीन टप्प्यात क्लिनिकल चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये सुरक्षा, प्रतिकार शक्ती आणि प्रभाव/कार्यक्षमता यांची चाचणी या टप्प्यात केली जाते. याद्वारे ही लस कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कोविड 19 चा आजार होण्यापासून रोखते की नाही हे यातून सिद्ध होते. जागतिक आरोग्य संघटनेनं लशीसाठी प्रभावी आणि सुरक्षिततेचं प्रमाण 50 टक्के ठरवलं आहे.
हे वाचा - 3 वर्षात प्रत्येक भारतीयाचं लशीकरण होणार; तोपर्यंत स्वत:ला जपा !
क्लिनिकल सायंटिस्ट आणि भारतातील आघाडीचे लशीकरण शास्त्रज्ञ प्रा. गगनदीप कांग म्हणाले, लशीच्या प्रभावाचं प्रमाण हे प्रत्येक चाचणीत सहभागी असलेल्या लोकांची संख्या आणि चाचणी गटातील संक्रमित झालेल्या लोकांमधील लस प्राप्त झालेले किंवा प्लेसबो मिळालेले यांच्यावरील परिणाम यावर अवलंबून असते. लस दिलेल्या गटामध्ये संसर्गाचं प्रमाण कमी असेल तर ती लस कार्यक्षम असल्याचे दर्शवते. प्रत्येक गटातील किती जणांवर या लशीचा प्रभाव होत आहे यावरही ते अवलंबून आहे, असं त्यांनी सांगितलं.
याबाबत नियंत्रकांनी क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रभावी ठरणारी लस आणि प्रतिकारक यांच्यातील सीमारेषा स्पष्ट केली पाहिजे असंही प्रा. कांग यांनी म्हटलं आहे. प्रतिजैविकाची कार्यक्षमता म्हणजे ही लस प्रतिकारक आहे, यापेक्षा अधिक काही नाही. हा आजार ती लस रोखू शकते काय, जे जाणून घेणे महत्त्वाचं आहे.
लशीचं ट्रायल जसजसं प्रगत टप्प्यावर पोहोचेल तसा तिचा प्रभाव बदलेल का?
तिन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या अंतरिम चाचण्यांच्या निष्कर्षांचा आढावा घेण्यात आलेला नाही किंवा याबाबतचा कोणताही सायंटिफिक पेपर प्रसिद्ध झालेला नाही. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेन्का यांच्या लशीची चाचणी ब्रिटन आणि ब्राझीलमध्ये होत आहे. तर काही चाचण्या इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमार्फत भारतात होत आहेत. प्रा. कांग म्हणाले, "या चाचण्या सुरू असल्या तरी अंतरिम चाचण्यांचे निकालही उत्तम आहेत. अर्थात आपण जे करतोय ते एका मर्यादेत करत आहोत. प्रत्यक्ष आयुष्यात या चाचण्या करण्यात आल्या तर तेच निकाल मिळतील की नाही? चाचण्यांची कार्यक्षमता 95 टक्क्यांच्या आसपास असणं ही मर्यादा लस कार्यक्षम आणि विश्वासार्ह असण्याचे संकेत आहे", असंही कांग यांनी नमूद केलं.
हे वाचा - सुरक्षा देईल पण संक्रमण रोखणार नाही; 94% प्रभावी लस देणाऱ्या कंपनीकडून धक्का
"या लशी दीर्घकाळ कोविड 19 ला रोखण्यात यशस्वी ठरतील हे देखील माहीत नाही. चाचण्या संपतील तेव्हा कालानुरूप या लशी उपयुक्त ठरतील की नाही तेही माहीत नाही. यांचे निकाल अद्याप नियंत्रकांकडे देण्यात आलेले नाहीत. चाचण्या पूर्ण होऊन त्यांचे निकाल प्रकाशित करण्यात आले पाहिजेत", असं पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. श्रीकांत रेड्डी यांनी म्हटलं आहे.
परदेशातील लशीला परवानगी मिळण्यासाठी देशातील चाचण्यांचा अहवाल गरजेचा आहे का?
अमेरिकेतील लस भारतासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे सूतोवाच भारत सरकारनं केलं आहे. त्यामुळे ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेन्का यांची लस आणि भारत बायोटेक तर्फे विकसित करण्यात येत असलेली संपूर्ण भारतीय लस यावरच भारताच्या आशा आहेत. ऑक्सफर्डच्या लशीचं सीरम इन्स्टिट्युट मोठ्या प्रमाणात उत्पादन करत असून, ऑक्सफर्डकडून मिळालेल्या मास्टर सीडच्या आधारावर करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची माहितीही त्यांनी देणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.
हे वाचा - रुग्णाला वाचवणाऱ्या CORONA WARRIORS ची अवस्था; PHOTO पाहून अंगावर येईल काटा
"आपल्याकडील नियंत्रकांनी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत माहितीचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. लोकसंख्येच्या आधारावर गृहितकांमध्ये बदल होतात. आपण फक्त आंतरराष्ट्रीय माहिती गृहित धरू शकत नाही. योग्य तपासणी केल्याशिवाय कशालाही मान्यता देणे योग्य नाही", असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus