वॉशिंग्टन, 25 नोव्हेंबर : आतापर्यंत काही औषध कंपन्यांनी आपली कोरोना लस (corona vaccine) 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचं जाहीर केलं. यामध्ये अमेरिकेतील फायझर आणि मॉडर्ना कंपनीसह रशियानं तयार केलेल्या लशीचाही समावेश आहे. या कोरोना लशी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्यानं आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच या लशींमुळे कोरोनाव्हायरसला आळा बसेल अशी अपेक्षा आता वाटू लागली आहे. मात्र अशी लस तयार करणाऱ्या औषध कंपनीनंच मोठा धक्का दिला आहे.
आपली कोरोना लस 94.5 टक्के प्रभावी असली तरी ती कोरोनापासून सुरक्षा देईल मात्र कोरोनाला पसरण्यापासून रोखू शकणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मॉडर्नाच्या मुख्य वैज्ञानिकांनी सांगितलं की, या लशीमुळे लोकांना आजार होण्यापासून वाचवू शकतो पण व्हायरस पसरण्यापासून रोखू शकत नाही.
मॉडर्नाचे मुख्य वैज्ञानिका तल जस्क यांनी सांगितलं, "आम्ही केलेल्या ट्रायलच्या अहवालानुसार कोरोना लस तुम्हाला आजारी पडण्यापासून वाचवू शकेल मात्र ट्रायलच्या अहवालातून एखादी व्यक्ती संक्रमित झाल्यास ही लस व्हायरसचा प्रसार रोखू शकेल की नाही हे आम्हाला समजू शकलेलं नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झाली आणि तिला ही लस दिली तर कदाचित ही लस त्या व्यक्तीपासून इतर लोकांपर्यंत व्हायरस पसरण्यापासून रोखू शकणार नाही. ट्रायलदरम्यान आपण असा परिणाम तपासून पाहिला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं"
हे वाचा - महाराष्ट्रात 'एंट्री' करण्यासाठी आजपासून नवे नियम लागू,पाहा दादर स्टेशनचे PHOTOS
आज तकनं डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. रिपोर्टनुसार, ना मॉडर्नाची, ना फायझर कंपनीची कोणतीच कोरोना लस संक्रमण रोखण्यात फायदेशीर आहे का, याची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे लशीच्या प्रभावी निकालाकडे अति उत्साहानं पाहू नये, असं जस्क यांनी सांगितलं.
हे वाचा - 3 वर्षात प्रत्येक भारतीयाचं लशीकरण होणार; तोपर्यंत स्वत:ला जपा !
इतर लशींप्रमाणेच मॉडर्नाची लसही अशाच पद्धतीनं तयार करण्यात आली आहे, जे शऱीरातील व्हायरसचा नाश करत नाही तर व्हायरला शरीरातील रिसेप्टरला जोडण्यापासून रोखते. ज्यामुळे लोक आजारी पडत नाही. तर अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीच्या ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटानुसार, ही लस व्हायरसचा प्रसार रोखण्याची शक्यता आहे. हे ट्रायल अद्याप पूर्ण झालेलं नाही.