कोरोनाव्हायरसमुळे कोरोना रुग्णांवर काय परिणाम होतो, रुग्णांची अवस्था किती खराब होते हे आतापर्यंत आपण पाहतच आलो आहोत. मात्र कधी या रुग्णांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कोरोना वॉरिअर्सचा विचार केला का? दुसऱ्यांचा जीव वाचवताना आपला कोरोनापासून बचाव करण्यासाठी कित्येक तास संपूर्ण शरीर पीपीई किटनं झाकून घेणारे डॉक्टर कोरोनापासून सुरक्षित असल्याचं वाटतं. मात्र यामागे त्यांना किती वेदना सहन कराव्या लागत आहेत, किती जखमा होत आहेत हे पाहिल्यावर अंगावर काटाच येईल.