नवी दिल्ली, 22 डिसेंबर : चीनमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ज्या देशात पहिल्यांदा कोरोना रुग्ण सापडला होता, त्याच देशात झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युंमुळे भारत हाय अलर्टवर आहे. केंद्र सरकारने बुधवारी या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत तज्ज्ञ आणि अधिकार्यांनी भारतातील लस कव्हरेज सुधारण्याचं महत्त्व या विषयावर भर दिला. सध्या, भारतात कोरोना प्रतिबंधात्मक डोस केवळ 27 टक्के नागरिकांनी घेतला आहे ही बाब निराशाजनक आहे. बैठकीनंतर बुधवारी नीती आयोगातील आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ज्येष्ठ नागरिकांना सावधानता बाळगण्यासाठी कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. ज्यांनी आधीच बूस्टर डोस घेतला आहे, त्यांना चौथ्या डोसची आवश्यकता आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या प्रश्नाबाबत ‘इंडिया टुडे टीव्ही’शी बोलताना एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, फक्त तिसरा डोस घेण्याची गरज आहे. चौथ्या डोसची आवश्यकता आहे, याबाबत सूचक इशारा देणारा कोणताही डेटा सध्या उपलब्ध नाही. जोपर्यंत बायव्हॅलंट लसीसारखी विशिष्ट नवीन लस येत नाही, तोपर्यंत तरी नाहीच. (Coronavirus : देशात कोरोनाचा कहर वाढू नये म्हणून तज्ज्ञांनी केल्या गंभीर सूचना, Video) बायव्हॅलंट लस एकाचवेळी दोन व्हायरसवर प्रभावी बायव्हॅलंट लस एकाचवेळी दोन व्हायरस किंवा त्यांच्या प्रकारांवर व्हेरियंटवर आहे. पहिला 2019 पासून मूळ SARS-CoV-2 विषाणूवर आणि दुसरा स्ट्रेन, कोरोनाचा Omicron प्रकार या दोन्ही व्हेरियंटवर ती प्रभावी आहे. कोविड-19 ला कारणीभूत असलेला कोरोना विषाणू कालांतराने विकसित झाला आहे. परंतु, यापैकी काही प्रकारांनी चिंता वाढवली आहे. काही लस उत्पादकांनी या प्रकारांविरूद्ध अधिक चांगलं संरक्षण देण्यासाठी त्यांच्या लसी बायव्हॅलंट लसीमध्ये अपडेट केल्या आहेत. बायव्हॅलंट लस केवळ बूस्टर डोस म्हणूनच बायव्हॅलंट लसीला फक्त बूस्टर डोस म्हणून वापरण्यासाठी परवानगी आहे. फू़ड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FDA ने बायव्हॅलंट लसीचं जे वर्णन केलं आहे, त्यानुसार “बायव्हॅलंट कोविड-19 लसींमध्ये कोविड विरोधात व्यापक संरक्षण प्रदान करण्यासाठी मूळ व्हायरस स्ट्रेनचा एक घटक तर सुधारित परिणामकारकता प्रदान करण्यासाठी ऑमिक्रॉन व्हेरियंटचा एक घटक समाविष्ट करण्यात आला आहे. या लसींमध्ये दोन घटक असल्याने त्यांना बायव्हॅलंट कोविड-19 लसी म्हणतात.” (corona virus lockdown : देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? कोरोनाने वाढवली चिंता, केंद्र सरकार सतर्क) भारतात वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी एकही बायव्हॅलंट लस नाही सध्या, भारतात वापरल्या जाणार्या लसींपैकी कोणतीही लस बायव्हॅलंट लस नाही. भारताबाहेरील फायझर आणि बायोएनटेकची बायव्हॅलंट लस आणि मॉडर्नाची लस यासारख्या mRNA लसींचा वापर केवळ बूस्टिंगच्या दृष्टिकोनातून केला जात आहे. केरळच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ राजीव जयदेवन यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलं की बूस्टर डोसची समस्या ही आहे की त्याचा प्रभाव कमी काळासाठी असतो. mRNAच्या लसी ज्या इतर देशांमध्ये चौथा डोस म्हणून वापरल्या गेल्या, त्या तिसऱ्या डोसपेक्षा लवकर त्यांचा प्रभाव दाखवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.