मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कोरोनाची वापसी, पुन्हा एकदा अनिवार्य होणार का मास्क?

कोरोनाची वापसी, पुन्हा एकदा अनिवार्य होणार का मास्क?

पुन्हा एकदा अनिवार्य होणार का मास्क?

पुन्हा एकदा अनिवार्य होणार का मास्क?

चीनमध्ये ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट BF7 खूप वेगाने पसरत आहे. यामुळे भारतातही आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मास्क वापरणं अनिवार्य होणार का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 डिसेंबर : चीनसह अनेक देशांमध्ये कोविड-19 ची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. गेल्यावर्षी कोरोनाने भारतात खूप नुकसान केले. आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. चीनमध्ये हे ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट BF7 खूप वेगाने पसरत आहे, यामुळे येत्या काही दिवसांत 1.5 दशलक्षाहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. भारतातही आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मास्क वापरणं अनिवार्य होणार का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. जाणून घेऊया माहिती.

दररोज सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या देशांच्या यादीत भारत 51 व्या क्रमांकावर आहे. मंगळवारी येथे तीन नवीन संक्रमित आढळले, तर कोणताही नवीन मृत्यू झाला नाही. भारतात आतापर्यंत 4.46 कोटी लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 4.41 कोटींहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर 5.30 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात सध्या 4,527 रुग्ण उपचार घेत आहेत. सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत भारत सध्या जगात 90व्या क्रमांकावर आहे.

जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा...नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

पुन्हा एकदा मास्क अनिवार्य होणार का?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, 'आता आम्ही कोरोनाच्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत. भारतात सध्या फारसा धोका नाही, पण तरीही खबरदारी म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे. हे लक्षात घेऊन आम्ही कोविड प्रोटोकॉल पुन्हा लागू करण्याचा विचार करत आहोत." कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे अनिवार्य केले जाऊ शकते. विशेषतः ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत. उदाहरणार्थ, खोकला, सर्दी किंवा कोणत्याही प्रकारचे व्हायरल झाल्यास मास्क घालणे बंधनकारक केले जाऊ शकते.

मास्कबरोबर कोणते नियम पुन्हा लागू करू शकते सरकार?

सोशल डिस्टंसिंगचे नियम : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणेही बंद केले आहे. आता पुन्हा एकदा त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकते.

विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस स्टँडवर रँडम चाचणी : दिल्ली, मुंबईसह सर्व प्रमुख विमानतळांवर रँडम कोरोना चाचणीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. विशेषत: कोरोनाबाधित देशांतून परतणाऱ्या लोकांच्या तपासावर भर जाऊ शकतो. अशा लोकांची तपासणी करून त्यांच्यात संसर्ग आढळल्यास जीनोम सिक्वेन्सिंगही केले जाऊ शकते. तसेच कोविडचे इतर प्रोटोकॉल पाळले जातील. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवरही रँडम चाचणी करण्याची तयारी सुरू आहे.

बूस्टर डोसची प्रक्रिया वेगवान : देशात आतापर्यंत 23 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आता त्यांची संख्या वेगाने वाढवण्यावर सरकारचा भर आहे. जास्तीत जास्त लोकांना बूस्टर डोस मिळावा अशी व्यवस्था केली जाईल.

#BF7Variant Coronavirus : कोरोना पुन्हा येतोय, लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का?

IMA ने जारी केली अॅडव्हायजरी

- आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने सर्वांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.

- साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा.

- सामाजिक अंतर पाळावे.

- सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे.

- शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.

- सर्दी, खोकला, ताप, घास खवखवणे, जुलाब यांसारखी लक्षण दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.

- लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा.

First published:

Tags: Corona, Covid cases, Health, Health Tips, Lifestyle, Mask