• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • तुमची बोटंच सांगतील तुम्हाला कॅन्सर आहे की नाही; घरबसल्या करा ही सोपी Finger test

तुमची बोटंच सांगतील तुम्हाला कॅन्सर आहे की नाही; घरबसल्या करा ही सोपी Finger test

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात घरबसल्या तुम्हाला कॅन्सर आहे की नाही हे समजण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : कॅन्सर (Cancer) म्हटलं की प्रत्येकाला खूप भीती वाटू लागते. आता आपला मृत्यू अटळ असंच अनेकांना वाटतं.  पण प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर चांगले उपचार शक्य आहेत. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगात लवकर निदान ही सर्वात महत्त्वाची बाब असते. कर्करोगाचं लवकर म्हणजेच सुरुवातीच्या काळात निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णांना दिलासा मिळू शकतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाबाबतदेखील (Lung Cancer) ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्हाला अगदी घरच्या घरीही फुफ्फुसाच्या कॅन्सरचं निदान करता येऊ शकतं, तेसुद्धा फक्त बोटांनी (Finger test for cancer detection). कॅन्सर रिसर्च यूकेनं (Cancer Research UK) एक फिंगर टेस्ट सांगितली आहे. यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात घरबसल्या तुम्हाला कॅन्सर आहे की नाही हे समजण्यास मदत होईल, असा दावा संशोधकांनी केला आहे. हे वाचा - पुरुषांसाठी चांगली बातमी; प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज ही टेस्ट करण्यासाठी एका हाताचा अंगठा आणि दुसऱ्या हाताची तर्जनी नखांच्या बाजूनं एकमेकांना जोडा. अंगठा आणि तर्जनी एकमेकांना चिटकल्यानंतर मधोमध हिऱ्यासारखा आकार तयार झालेला दिसेल. जर असा आकार तयार झाला नाही तर काहीतरी चिंताजनक लक्षण आहे. याला फिंगर क्लबिंग म्हटलं जातं. फिंगर क्लबिंग हे असामान्य असतं. फिंगर क्लबिंग (Finger Clubbing) तयार होण्यासाठी काही वर्ष लागू शकतात. मात्र फुफ्फुसाच्या कर्करोगात हे क्लबिंग लवकर दिसून येतं, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हे वाचा - कोरोना लसीचा डबल धमाका; 'या' कंपनीची लस ठरत आहे कॅन्सरवरही प्रभावी फिंगर क्लबिंग टेस्टमध्ये बोटं आणि नखांना सूज आणि प्रमाणापेक्षा अधिक मुलायमपणा हे धोक्याचे संकेत असतात. हे संकेत तुम्हाला आरोग्याविषयी बरंच काही खुणावत असतात. यामुळं फुफ्फुसं आणि हृदय विकारासंबंधी म्हणजेच कर्करोग किंवा मेसोथेलियोमाचं यातून निदान होऊ शकतं, असं कॅन्सर रिसर्च यूकेनं म्हटलं आहे. थायरॉईड किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस ग्रस्त रुग्णांमध्येही अशी लक्षणं दिसतात. त्यामुळं संबंधित रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असल्याचं कॅन्सर रिसर्च यूकेनं म्हटलं आहे.
First published: