prostate cancer : पुरुषांसाठी चांगली बातमी, प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज

prostate cancer : पुरुषांसाठी चांगली बातमी, प्रोस्टेटच्या कर्करोगावर इतक्या दिवसात होणार इलाज

प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. डॉक्टर आता अशा तंत्रावर काम करत आहेत, (prostate cancer patient treatment) ज्यात प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण एका आठवड्यात बरे होऊ शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : प्रोस्टेटचा कर्करोग (prostate cancer) हा पुरुषांना होणारा एक प्राणघातक आजार आहे. प्रोस्टेट ही एक लहान आकाराच्या अक्रोडाएवढी ग्रंथी असते. ती पुरुषांच्या मूत्राशय आणि गुप्तांगाच्या दरम्यान असते. या प्रोस्टेटमधील पेशींची जेव्हा असामान्यपणे वाढ होते, तेव्हा त्याचा ट्यूमर (गाठ) तयार होतो आणि बऱ्याचदा या जागी कर्करोग निर्माण होतो.

मात्र, आता प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. डॉक्टर आता अशा तंत्रावर काम करत आहेत, (prostate cancer patient treatment) ज्यात प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण एका आठवड्यात बरे होऊ शकतात.

हा आहे उपचारांसंबंधीचा अहवाल

'द टाइम्स'च्या अहवालानुसार, लंडनमधील रॉयल मार्सडेन हॉस्पिटलमधील डॉक्टर लवकरच एक चाचणी घेणार आहेत. यामध्ये रुग्णांना रेडिओथेरपीचे दोन डोस दिले जातील. चाचणीमध्ये, अनेक लहान डोस देण्याऐवजी रेडिओथेरपीचे फक्त दोन मोठे डोस देणे किती सुरक्षित आणि प्रभावी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

या महिन्याच्या सुरुवातीला, एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्चच्या संशोधकांना आढळलं की, विशिष्ट प्रमाणातील रेडिएशन प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार करू शकतं. संशोधकांच्या मते, एका महिन्यात 20 लहान सेशनऐवजी, रुग्णाला एक किंवा दोन आठवड्यांत किरणोत्सर्गाचे फक्त 5 डोस देऊनही उपचार करता येतात.

हे वाचा - पुजाऱ्यांचे वटवृक्षाच्या शेंड्यावर उपोषण, मौन धारण करून केली मोठी मागणी; पाहा PHOTOs

सुलभ आणि जलद उपचार

चाचणीचे प्रमुख आणि सल्लागार क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अॅलिसन ट्री यांनी टाइम्सला सांगितलं की, ही उपचार पद्धती यशस्वी झाली तर पुरुष उपचार घेतल्यानंतर सहजपणे त्यांचं सामान्य आयुष्य पुन्हा जगू शकतील. यानंतर ते त्यांना कर्करोग होता ही बाब पूर्णपणे विसरू शकतील. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, या कर्करोगाच्या उपचारांसाठी केली जाणारी 20 सेशन्स 2 पर्यंत कमी केल्यानं केवळ लाखो पाउंड्सचीच बचत होणार नाही तर, अधिक रुग्णांवर रेडिओथेरपी युनिटद्वारे उपचारही करता येईल.

हे वाचा - कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळेल 50 हजारांची भरपाई, केंद्राचं सर्वोच्च न्यायालयात उत्तर

संशोधकांचं म्हणणं आहे की, या नवीन तंत्रानं किरकोळ दुष्परिणामांसह अत्यंत आशादायक परिणाम दर्शवलेत. याद्वारे आम्हाला समजून घ्यायचं होतं की आम्ही रुग्णांवर उपचार करताना दररोज रेडिएशनचं प्रमाण सुरक्षितपणे वाढवू शकतो की नाही. प्रोस्टेट कर्करोगावर दोन प्रकारे उपचार केले जातात. पहिला पर्याय म्हणजे ऑपरेशन. यामध्ये प्रोस्टेट काढून टाकलं जातं. मात्र, यानंतर अनेक पुरुषांना इरेक्टाइल डिसफंक्शन आणि लघवीमध्ये असंयम (urinary incontinence) होण्याची समस्या उद्भवू शकते. दुसरा उपचारांचा पर्याय म्हणजे रेडिओथेरपी. यामध्ये क्ष-किरणांद्वारे (X-Ray Beam) ट्यूमरच्या पेशी नष्ट केल्या जातात.

Published by: News18 Desk
First published: September 22, 2021, 9:00 PM IST

ताज्या बातम्या