मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्ट्रेच मार्क्स दूर करायला, हे तेल आहे रामबाण उपाय! कसं वापरायचं आणि कधी?

स्ट्रेच मार्क्स दूर करायला, हे तेल आहे रामबाण उपाय! कसं वापरायचं आणि कधी?

अनेकांच्या पोटावर, छातीवर, पायावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स (stretch marks) येतात. त्यावर एक अगदी साधा घरगुती पण रामबाण उपाय आहे.. वाचा सविस्तर..

अनेकांच्या पोटावर, छातीवर, पायावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स (stretch marks) येतात. त्यावर एक अगदी साधा घरगुती पण रामबाण उपाय आहे.. वाचा सविस्तर..

अनेकांच्या पोटावर, छातीवर, पायावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स (stretch marks) येतात. त्यावर एक अगदी साधा घरगुती पण रामबाण उपाय आहे.. वाचा सविस्तर..

दिल्ली, 9 फेब्रुवारी: अनेकांच्या पोटावर, छातीवर, पायावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स (stretch marks) येतात. स्ट्रेच मार्क्सची समस्या ही मुख्यत्वेकरून गर्भधारणा आणि शरीराचं वाढतं वजन या कारणांमुळे उद्भवते. विशेष करून गरोदरपणाचा काळ संपल्यानंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात. अशा परिस्थितीत या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा (Castor Oil Benifits) वापर करू शकता. एरंडेल तेल हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. स्ट्रेच मार्क्सवर एरंडेल तेल (Castor Oil for Stretch Marks) खूप चांगलं काम करतं. 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक अ‍ॅसिड असतं. स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवण्यासाठी एरंडेल तेल हा सर्वोत्तम मार्ग आहे. एरंडेल तेलातली पोषक तत्त्वं कोलॅजेन आणि इलास्टिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचं काम करतात. एरंडेल तेलाचा वापर अनेक प्रकारे करता येतो. अ‍ॅव्होकॅडो, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी यांसारख्या घटकांमध्ये एरंडेल तेल मिसळून ते स्ट्रेच मार्क्सवर लावू शकता. एरंडेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल समप्रमाणात मिसळावं. हे तेलाचं मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि 10 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. यानंतर तो भाग स्वच्छ कापडाने झाकून टाकावा. त्या ठिकाणी हीट कॉम्प्रेस लावा आणि 20 मिनिटं तसंच ठेवा. यानंतर कापड काढावं आणि जास्तीचं तेल पुसून टाकावं. असे रोज केल्यास स्ट्रेच मार्क्स नाहीसे होतात. याशिवाय कोरफडीचं जेल आणि एरंडेल तेल यानेदेखील स्ट्रेच मार्क्स लवकर जातात. यासाठी कोरफडीचं जेल आणि एरंडेल तेल एक चतुर्थांश प्रमाणात घ्या. या मिश्रणाने स्ट्रेच मार्क्सवर मसाज करा. यानंतर काही वेळ तसंच ठेवा. हा उपाय केल्याने स्ट्रेच मार्क्सचा त्रास दूर होईल. एरंडेल तेल आणि गुलाब जल एक-एक चमचा घ्या. हे दोन्ही एकत्र करून स्ट्रेच मार्क्सवर लावा. काही वेळ हलक्या हातांनी मसाज करा आणि ते पूर्णपणे त्वचेला शोषून घेऊ द्या. याशिवाय, एक ते दोन चमचे एरंडेल तेल घ्या आणि त्यात थोडासा ताजा लिंबाचा रस घालून मिश्रण बनवा. आता स्ट्रेच मार्क्स असलेल्या जागेवर ते लावा. काही मिनिटं बोटांनी हळुवारपणे मसाज करा. मसाजनंतर 10-15 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने ती जागा स्वच्छ धुऊन घ्या. हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा करू शकता. याचा फायदा लवकरच दिसून येईल. एरंडेल तेल आणि अ‍ॅव्होकॅडोदेखील स्ट्रेच मार्क्सवर प्रभावी ठरतात. एक ताजं, पिकलेलं अ‍ॅव्होकॅडो अर्धं कापून घ्या. ते एका काट्याने मॅश करा आणि गुठळ्या नसलेली पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये एक चमचा एरंडेल तेल घाला आणि दोन्ही घटक चांगले मिसळा. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. सुमारे 10 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने धुवा. असं केल्याने काही महिन्यांत तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील.

First published:

Tags: Ayurved, Health, Home remedies

पुढील बातम्या