मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जास्त व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका अन् ब्रेन हॅमरेजचा धोका, किती तास करावं वर्कआऊट?

जास्त व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका अन् ब्रेन हॅमरेजचा धोका, किती तास करावं वर्कआऊट?

संशोधनात असं समोर आलं आहे की, गरजेपेक्षा जास्त कठीण व्यायाम (high intensity exercise) करणाऱ्या व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन शकतो.

संशोधनात असं समोर आलं आहे की, गरजेपेक्षा जास्त कठीण व्यायाम (high intensity exercise) करणाऱ्या व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन शकतो.

संशोधनात असं समोर आलं आहे की, गरजेपेक्षा जास्त कठीण व्यायाम (high intensity exercise) करणाऱ्या व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन शकतो.

  मुंबई 18 ऑगस्ट : व्यायाम करणं (Exercising) शरीराच्या वाढीसाठी (body growth) फायदेशीर असतं. सध्या जिममध्ये जाऊन वर्कआऊट करणार्‍यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. व्यायाम केल्यामुळे शरीर सदृढ राहतं. पण तुम्हाला माहिती आहे का, व्यायाम केल्यामुळे शरीराला फायदा (beneficial for the body) होत असला तरी, अति-व्यायामाची सवय (habit) धोकादायक ठरू शकते. टीव्ही स्टार दीपेश भानच्या ब्रेन हॅमरेजचं आणि सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका येण्यामागचं कारणदेखील जिममध्ये तासनतास केलेला कठोर व्यायाम होतं. डीएनए हिंदीने याबाबत वृत्त दिल आहे.

  संशोधनात असं समोर आलं आहे की, गरजेपेक्षा जास्त कठीण व्यायाम (high intensity exercise) करणाऱ्या व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन शकतो. तर, काही जणांना यामुळे ब्रेन हॅमरेजदेखील होऊ शकतं. अभिनेता सिद्धार्थ शुक्लासुद्धा रोज 3-4 तास वर्कआउट करायचा.

  Weight Loss Tips : अगदी सहज कमी करा वजन, मोबाईल पाहतानाही करता येतील या एक्सरसाइज

  'भाभीजी घर पर हैं'मध्‍ये विभूतीची भूमिका करीत असणाऱ्या असिफ शेखने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘तो दीपेश भान याला जास्त व्यायाम करू नकोस आणि शरीरावर इतके प्रेशर टाकू नकोस, असं नेहमी सांगायचा. पण तो तासनतास व्यायाम करायचा. दीपेश दारू आणि सिगारेटसारख्या वाईट व्यसनापासून दूर होता. तो तीन तास जिममध्ये व्यायाम करायचा. याशिवाय रनिंग करायचा, क्रिकेटही खेळायचा. एवढचं नाही, तर बऱ्याच वेळ काहीही न खाता तो व्यायाम करायचा. दीपेशची जास्त व्यायाम (High intensity exercise) करण्याची हीच सवय त्याच्यासाठी जीवघेणी ठरली.

  यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अतिव्यायाम केल्याने अचानक कार्डिअ‍ॅक अरेस्ट (SCA) किंवा कार्डिअ‍ॅक डेथ (SCD) आणि ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो. या मृत्यूमागे अनेक कारणं आहेत. 'दीपेश भानचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे झाला होता. त्याला कारण होतं, झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी क्रिकेट खेळायला सुरुवात करणं. खरं तर ब्लड प्रेशर सहसा सकाळी कमी असतं, आणि रिकाम्यापोटी शरीरातील साखरेचं प्रमाणदेखील कमी होतं. अशावेळी अचानक व्यायाम करणं किंवा कठीण खेळ खेळणं ब्रेन हॅमरेजचं कारण ठरतं. तसंच जिममध्ये तासनतास व्यायाम केल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते, आणि यामुळे हृदय काम करणं थांबवतं. बॉलीवूड गायक केकेच्या मृत्यूचं कारण सुद्धा एक्सेस स्‍वेटिंग हे ठरलं होतं.

  गोंगाटातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा! मौनाचे शारीरिक अन् मानसिक फायदे अनुभवा

  हे लक्षात ठेवा

  निरोगी राहण्यासाठी 45 मिनिटे ते 1 तासाचा व्यायाम पुरेसा आहे. जर तुम्ही जास्त वेळ व्यायाम करत असाल, तर तुम्ही तो तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावा. जेणेकरून त्यांच्याकडून वेळोवेळी तुमचा पल्‍स रेट, हार्ट बीट आणि इतर आरोग्याशी संबंधित गोष्टींकडे लक्ष दिलं जाईल. याशिवाय, मॅरेथॉन धावपटूंवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, मॅरेथॉनची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर जेव्हा धावपटूंच्या रक्ताचे नमुने घेतले गेले, तेव्हा त्यांच्यामध्ये हृदयाच्या नुकसानाशी संबंधित बायोमार्कर आढळले. सहसा, हे डॅमेज इंडिकेटर स्वतःहून कमी होतात, परंतु यामुळे तुमचं हृदय वारंवार शारीरिक ताण सहन करत राहतं, आणि त्यामुळे धोका कायम असतो.

  बर्‍याच जणांना व्यायाम करायची आवड असते. पण अनेकांना किती वेळ व्यायाम करणं योग्य असतं, हे ठाऊक नसतं. अशावेळी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केला जातो. मात्र, कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास अपाय होऊ शकतो, हे विसरू नये. निरोगी आरोग्यासाठी स्वत:चा योग्य वर्कआऊट प्लॅन तयार करणं फायद्याचे ठरू शकतं.

  First published:
  top videos

   Tags: Health Tips, Types of exercise