मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Weight Loss Tips : अगदी सहज कमी करा वजन, मोबाईल पाहतानाही करता येतील या एक्सरसाइज

Weight Loss Tips : अगदी सहज कमी करा वजन, मोबाईल पाहतानाही करता येतील या एक्सरसाइज

मोबाईल पाहताना करा या एक्सरसाइज

मोबाईल पाहताना करा या एक्सरसाइज

अनेक जण वजन कमी करण्यासाठी कठीण व्यायाम आणि सकाळी धावणे आणि चालणे अशा कसरती करतात. परंतु अनेक जण असे देखील असतात ज्यांना व्यायाम करायला अजिबात आवडत नाही. तर काहींना व्यायाम करण्यास वेळ नसतो.

  मुंबई, 18 ऑगस्ट : आजकाल अनेकांना वाढत्या वजनाचा सामना करावा लागत आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी कठीण व्यायाम आणि सकाळी धावणे आणि चालणे अशा कसरती करतात. परंतु अनेक जण असे देखील असतात ज्यांना व्यायाम करायला अजिबात आवडत नाही. तर काहींना व्यायाम करण्यास वेळ नसतो. असे असेल तर वजन वाढणे सहाजिक असते. परंतु व्यायामाचे असेही काही प्रकार आहेत, जे तुम्ही अगदी सहज करू शकता आणि ते करण्यासाठी फारशी मेहनत देखील लागत नाही. हे व्यायाम तुम्हाला वजन कमी करण्यास उपयोगी ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही व्यायामाचे प्रकार सांगत आहोत. जे तुम्ही घरी आराम करताना आणि मोबाईल खेळताना देखील करू शकता. लेग रायजेज (Leg Raises) झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, हा व्यायाम केल्याने पोटावरील चरबी कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम बेडवर पाठीवर आरामात झोपा आणि दोन्ही पाय सरळ करा. आता दोन्ही पाय वर उचला आणि त्यांना 60 अंशांवर आणून स्ट्रेच करा. यानंतर पाय पुन्हा बेडच्या दिशेने खाली आणा. हा व्यायाम पुन्हा पुन्हा करा. लक्षात ठेवा की आपले पाय ठेवताना बेडला टच होऊ होऊ देऊ नका.

  कसा करतात बर्पीज कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज? आरोग्याला मिळणारे फायदे आहेत खास

  ग्लूट ब्रिज (Glute Bridges) हा व्यायाम पायांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी ओळखला जातो. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम बेडवर आरामात झोपा. त्यानंतर पायाचा तळवा बेडवर ठेवा आणि गुडघा वाकवा. आता तुमचे शरीर काही सेकंद वर उचला. त्यानंतर शरीर पुन्हा खाली ठेवा. हा व्यायाम 10 वेळा करा.

  तुम्हीही नाश्त्याच्यावेळी या चुका करता? आत्ताच बदला सवय, शुगर वाढण्यासोबत होतात अनेक दुष्परिणाम

  डेड बग्स (Dead bugs) हा व्यायाम केल्याने पोट, कंबर आणि पायावरील चरबी झपाट्याने कमी होते. हा व्यायाम करण्यासाठी बेडवर आरामात झोपा. मग गुडघे वाकवा. दोन्ही पाय नितंबांपासून एक फूट अंतरावर ठेवा. यानंतर तुमचा उजवा पाय शक्य तितका पुढे न्या. त्यानंतर हा व्यायाम डाव्या पायाने देखील करा. सर्वोत्तम परिणामांसाठी दिवसातून किमान दोन वेळा 10 मिनिटे हा व्यायाम करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Types of exercise

  पुढील बातम्या