ब्रिटन, 04 ऑगस्ट : आई-वडील (Mother parents) होणं हा प्रत्येक दाम्पत्याच्या (Couple) आयुष्यातील अविस्मरणीय, सुंदर असा क्षण असतो. पण काही दाम्पत्यांना काही कारणांमुळे हे सुख लाभत नाही. किमान एक तरी मूल व्हावं, यासाठी मग या दाम्पत्याची धडपड सुरू होते. वेगवेगळे उपचार केले जातात. ब्रिटनमधील (Britain couple) अशाच एका दाम्पत्याला दोन दशकांनी मूल झालं. पण ते कोणत्याही उपचाराने नाही तर फक्त आहारातील एका बदलामुळे. ब्रेड खाणं सोडलं आणि त्यांच्या पदरात मूल पडलं (Couple conceive baby after stop eating bread).
मोंटगोमेरीमध्ये राहणारा 55 वर्षांचा स्टिफन आणि त्याची 41 वर्षांची बायको रेचल ग्रीनवुड. या दाम्पत्याला अशा काही आरोग्याच्या समस्या होत्या ज्यामुळे त्यांना मूल होण्याची शक्यता कमी होती. आयव्हीएफमार्फतसुद्धा त्यांना मूल होणं कठीण होतं. त्यामुळे त्यांना मूल होणारच नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
रेचलला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे. तर स्टिफनसोबत लहानपणी अशी दुर्घटना झाली, ज्यामुळे त्याचे शुक्राणू खूप कमी झाले होते. स्टिफनला डायबेटिजही होतं. त्यामुळे त्याला यीस्ट इन्फेक्शन व्हायचं. याचाही परिणाम त्याचा स्पर्म काऊंटवर होत होता. दोघांचीही समस्या पाहता डॉक्टरांनी त्यांना मूल होणारच नाही असं स्पष्टपणे सांगितलं. यामुळे हे दाम्पत्य नाराज होतं.
हे वाचा - वाढत्या वयात उत्साह टिकून राहण्यासाठी रोज खा ही Enery booster
अखेर स्टिफननं यीस्ट इन्फेक्शनमुळे आपल्या आहारातील यीस्ट प्रोडक्ट्स हटवले. त्याने ब्रेड आणि पेस्ट्री खाणं बंद केलं. यानंतर दोन आठवड्यांत त्याचं इन्फेक्शन संपलं आणि पाच महिन्यानंतर रेचल प्रेग्नंट असल्याची बातमी मिळाली.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारी, 2021 मध्ये रेचलला किडनी स्टोनच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर काही दिवसांत तिच्या पोटात वेदना सुरू झाल्या. तिची त्वचा पिवळी प़डू लागली. रेचलला नेमकं झालं तरी काय म्हणून तिची तपासणी केली. त्यावेळी रेचल प्रेग्नंट असल्याचं समजलं. यानंतर या दाम्पत्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
हे वाचा - बॅक्टेरियांमुळे दीर्घायुष्य; शतक गाठणाऱ्या व्यक्तींच्या आतड्यात असतात हे जीवाणू
दोन दशकांपासून हे कपल मुलासाठी प्रयत्न करत होतं. पण आहारातील एका बदलामुळे 5 महिन्यांतच त्यांच्या पदरात हे सुख पडलं. 1 जुलै, 2021 रोजी त्यांच्या बाळाने जन्म घेतला. त्याच्या जन्मानंतर दोघंही खूप आनंदी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Couple, Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant, Small baby