लखनऊ, 26 जून : वाजतगाजत नवरीला न्यायला वरात आली... नवरदेवाचं स्वागत झालं... लग्नाच्या (Wedding) विधीही सुरू झाल्या... वधू-वरांनी (Bride and groom) एकमेकांना वरमाला घातल्या... आणि सप्तपदी घेणार तोच नवरीने तिच्या मनातील गोष्ट सांगितली आणि फक्त वरच नाही तर वधूच्या कुटुंबालाही धक्का बसला. आल्या पावली वरातीला नवरीशिवाय रिकाम्या हातीच परतावं लागलं.
उत्तर प्रदेशच्या (Uttar pradesh) महोबा जिल्ह्यातल्या मुढारी गावातील एका लग्नाची ही गोष्ट. मुढारी गावात राहणाऱ्या मुलीचं झांसीतील मुलासोबत लग्न ठरलं. 24 जूनला लग्नाचा मुहूर्त होता. तसं त्यादिवशी लग्न लागत होतं. लग्नाच्या निम्म्या विधी पार पडल्या. सात फेरे सुरू होणार होते, पण नवरीने अचानक लग्न थांबवलं आणि तिने चक्क लग्नाला नकार दिला. नवरीचा निर्णय ऐकून दोन्ही कुटुंब हादरलं.
हे वाचा -ढुसकी सोडणारा नवरा नको गं बाई!; Matrimonial ad मध्ये तरुणीने ठेवली विचित्र अट
आज तकच्या रिपोर्टनुसार संपूर्ण रात्र दोन्ही कुटुंब आणि गावातील वरिष्ठ लोकांमध्ये चर्चा झाली. नवरीला लग्नासाठी तयार करण्यासाठी प्रयत्न झाले. पण नवरी काही ऐकली नाही. तिने आपला नकार कायम ठेवला. आपल्याला नवरा आवडला नाही, असं कारण तिने दिलं. मग काय रात्रभराचे नवरीला मनवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी वरात परत माघारी गेली.
हे वाचा - मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार
नवरीच्या छोट्याशा निर्णयामुळे इतके दिवस नवऱ्याने रंगवलेल्या संसाराच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं. नवरीला मुलगा आवडला नाही तर तिने आधी का नाही सांगितलं, तिनं लग्नाच्या काही विधी पूर्ण झाल्यावर का सांगितलं, यामुळे या लग्नाची चर्चा होते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Couple, Marriage, Relationship, Uttar pradesh, Wedding, Wedding couple