• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार, वऱ्हाडीही दुखावले!

मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार, वऱ्हाडीही दुखावले!

काही दिवसांपूर्वी लग्नाच्या जेवणात माशाचं डोकं खाण्यासाठी वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेत अनेक जणं जखमी झाले होते.

 • Share this:
  जाजपुर, 26 जून : ओडिसामधील (Odisha) जाजपुरमधून (Jajpur) एक हैरान करणारं वृत्त समोर आलं आहे. येथून एका 27 वर्षांच्या नवरदेवाने लग्नमंडपात एका विचित्र कारणामुळे  लग्नासाठी नकार दिला आहे. त्यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. वऱ्हाड्यांना जेवणात मटण न मिळाल्याने नवरदेव चिडला आणि लग्नातून ताडताड निघून गेला. धक्कादायक म्हणजे त्याच रात्री नवरदेवाने दुसऱ्या तरुणीसोबत लग्नगाठ बांधली. खायला मटण मिळालं नाही म्हणून नवरदेव भडकला द न्यू इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार, नवरदेवाचं नाव रमाकांत पात्र असल्याचं सांगितलं आहे. त्याचं लग्न सुकिंग येथे राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरलं होतं. लग्नासाठी जेवणाचीही चांगली तयारी करण्यात आली होती. मात्र मटणाची तेवढी कमी होती. मात्र नेमकी हिच बाब नवरदेवाच्या जिव्हारी लागली. आणि लग्नात मटण नसल्याचं दिसताच त्यानं लग्न करण्यास नकार दिला. (Groom Refused To Marry With Bride). काय झालं होतं त्या दिवशी? बुधवारी नवरदेव वाजत-गाजत मुलीकडे पोहोचला. मुलीकडील सदस्यांनाही उत्साहात त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर लग्नाचे विधी सुरू झाले. दरम्यान जेवणात नेमकं मटण नसल्यामुळे वऱ्हाड्यांचा हिरमोड झाला. त्यांनी मुलीकडील नातेवाईकांसमोर आरडा-ओरडा सुरू केला. ही बाब नवरदेवाच्या कानावर पडली. मुलाकडील सदस्यांचं म्हणणं होतं की, लग्नात मटणाची मागणी आधीपासून करण्यात आली होती. ती पूर्ण का केली नाही? मटण का ठेवलं नाही?? हे ही वाचा-5 वर्षांपूर्वी केलेल्या कृत्याची शिक्षा, लग्नानंतर नवरदेवाची थेट तुरुंगात पाठवणी लग्नातूनच गुपचूप नवरदेव पसार नवरदेवदेखील जेवणात मटण नसल्यामुळे नाराज झाला होता. आणि भर मंडपात केवळ मटणासाठी त्याने लग्न करण्यास नकार दिला. यावेळी मुलीकडील मंडळी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही त्यांचं ऐकलं नाही आणि ते गावी निघून गेले. यावेळी नवरदेव जवळ असलेल्या आपल्या नातेवाईकांकडेच थांबला. त्याच रात्री ठरलं.. नवरदेवाने त्याच रात्री नातेवाईकांच्या गावातील एका मुलीशी लग्न केलं. त्यामुळे लग्न तुटलं तरी शेवटी तो नवरी घेऊनच घरी परतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लग्नात नवरदेवाला मटण मिळालं की नाही, याबाबत अद्याप काही कळू शकलेलं नाही.
  Published by:Meenal Gangurde
  First published: