• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • स्वातंत्र्याचं आंदोलन आहे कि लग्नाचा मंडप; वऱ्हाड्यांच्या घोषणांनी कार्यालय दुमदुमलं, पाहा मजेशीर VIDEO

स्वातंत्र्याचं आंदोलन आहे कि लग्नाचा मंडप; वऱ्हाड्यांच्या घोषणांनी कार्यालय दुमदुमलं, पाहा मजेशीर VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

  • Share this:
    मुंबई, 09 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. (Wedding Video) यामध्ये नवरदेव-नवरीच्या कपड्यांपासून (Bride Groom Video) लग्नातील गाणी आणि विधींचे व्हिडीओ देखील (Wedding Rituals) आवडीने पाहिले जातात. यात काही फनी व्हिडीओ देखील असतात. (Funny Video) तर काही व्हिडीओ हे (Weird Video) विचित्र असतात. सध्या सोशल मीडियावर नवरदेव-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीदरम्यान हाल घालतानाच्या विधीचा व्हिडीओ (Bride Groom Wedding Viral Video) व्हायरल झाला आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नातील हार घालण्याचा विधी सुरू आहे. ज्या वेळी नवरदेव नवरीला हार घालतो तेव्हा वऱ्हाड्यांमधून मोठमोठ्याने घोषणा दिल्या जातात. भारत माता की जय..भारत माता की जय..या घोषणा ऐकून सुरुवातील नवरी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहते. नंतर मात्र ही मस्ती तिला काही फासशी रुचली नसल्याचं दिसतं. तर दुसरीकडे बिचारा नवरदेव मात्र काहीही न ऐकल्याप्रमाणे नवरीच्या गळ्यात हार घालतो. अर्थात ही घोषणा देणारी मंडळी नवऱ्याचे मित्र असल्याचं सांगितले जात आहे. आता लग्न म्हटलं तर मजा-मस्ती आली. त्यात एकीकडे मित्र आणि दुसरीकडे पत्नी अशी नवरदेवाची अवस्था झाली आहे. हे ही वाचा-ना चढाओढ, ना स्पर्धा.. फक्त प्रेम; लग्नातील नवरदेव-नवरीचा सुंदर असा VIDEO या घोषणा ऐकताच नवरीच्या मागे उभ्या असलेले कुटुंबीयही हसू लागतं. दुसरीकडे नवरीला मात्र ही मस्ती फारशी आवडली नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरुन दिसतं. यानंतर जेव्हा कधी नवरदेवाचे मित्र त्याच्या घरी जातील, तेव्हा मात्र नवरी चांगलीच शिकवणी घेईल हे मात्र नक्कीच. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून लोक प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटलं आहे की, 'हे बघा आज आणखी एक मुलगा शहीद झाला', तर दुसऱ्या एका नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, 'लग्न करतोय तो बॉर्डरवर लढायला नाही चालला'.
    Published by:Meenal Gangurde
    First published: